शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

'कोरोना वॉरियर्स' आशा सेविकेच्या बलिदानाची केंद्राकडून दखल; कुटुंबाला मिळाली ५० लाखांची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 9:56 PM

कोरोनाशी लढताना आशा सेविका मंगल बलकवडे यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या या बलिदानाची केंद्र सरकारने घेतली दखल, पुणे जिल्ह्यातील पहिलेच कुटुंब

पुणे/हिंजवडी : कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नेमून दिलेले सर्वेक्षण तसेच कोरोनाबाधितांची माहिती गोळा करत माण येथील आशासेविका मंगल बलकवडे यांना कोरोनाने ग्रासले. कोरोनाशी लढताना त्यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या या बलिदानाची केंद्राने दखल घेतली असून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेंअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारची मदत मिळालेले बलकवडे हे पहिलेच कुटुंबीय ठरले आहे.

आयटीनगरी माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून मंगल बनसोडे कार्यरत होत्या. त्या माण येथील बोडकेवाडी येथे वास्तव्यास होत्या. माण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी काम करत होत्या. कोरोना महामारीच्या अगदी सुरुवातीपासून कोरोनाबाधित रुग्णांना धीर देणे, नजिकच्या आरोग्य केंद्रात पाठवणे, रुग्णवाहिका आणि बेड मिळवून देणे, घरोघरी जाऊन ग्रामस्थांचे सर्व्हेक्षण करून संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांची माहिती घेणे, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे गृहविलगीकरण करणे आदी कामात त्या महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. माण प्राथमिक आरोग्य केंद्रात आपले कर्तव्य बजावत असतानाच त्या कोरोनाबाधित झाल्या होत्या. मात्र, कोरोनाशी लढताना त्यांचे ६ सप्टेंबर २०२० ला निधन झाले. कोरोना लढ्यात त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता चांगली सेवा बजावली.

दरम्यान, त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत फ्रंटलाईन वर्कर्ससाठी असलेल्या नियोजित विम्याची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मिळावी यासाठी माण ग्रामपंचायत आग्रही होती. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने, पंचायत समिती मुळशीच्या माध्यमातून जिल्हा परिषदकडे पाठपुरावा केला होता. अखेर बलकवडे यांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळाली, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले. ----

पुणे जिल्ह्यात ४१ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यूजिल्हा परिषदेच्या १ हजार २४१ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाने ग्रासले आहे. तर १ हजार १८७ जण कोरोनातून बरे झाले आहे. या पैकी ४१ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांना विम्याची रक्कम देण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. लवकरच केंद्राकडे त्यांचे प्रस्ताव पाठवले जाणार असून त्यांनाही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत विमा योजने अंतर्गत मदत मिळवून दिली जाणार आहे.

प्राथमिक आरोग्य माण बोडकेवाडी येथे मंगल बलकवडे या २००८ पासून आशासेविका या पदावर मानधनावर कार्यरत होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, सुशील आणि प्रामाणिक होता. नेहमी हसतमुखाने न कंटाळता समाजात तळागळातील लोकांना आरोग्य सेवा मनोभावे देऊन त्या सामाजिक बांधिलकी जपत होत्या. मार्च २०२० पासून कोरोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातले होते. तेव्हा त्यांनी स्वत: जीवाची पर्वा न करता रात्र दिवस कोरोना रुग्णांची काळजी घेणे, धीर देत रुग्णालयात पाठविणे, तसेच त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, सर्व्हेक्षण करून संशयित रुग्णांचा शोध घेऊन खऱ्या अर्थाने त्या कोरोना योद्धा म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या या कार्याचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले आहे.

टॅग्स :Puneपुणेhinjawadiहिंजवडीcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारDeathमृत्यू