संतोष अवधूत ठोसर (वय ५१, रा. आंबेडकर वसाहत, औंध) असे त्यांचे नाव आहे. गेले काही दिवस संतोष हे कोरोना संक्रमित होते. दोन दिवस यांच्या घरच्यांनी मनपाने दिलेल्या सर्व नंबरवर कॉल केले, पण हे नंबर सारखेच बिझी लागत होते. कोणीही याची दखल घेत नव्हते. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यामुळे संतोष यांना शाश्वत हॉस्पिटल व मेडिपॉइंट हॉस्पिटल जवळच्या रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न केले. दोन्ही हॉस्पिटलने कोविड रुग्ण असल्यामुळे ॲडमिट करण्यास नकार दिला. औंध-बोपोडी, बाणेर परिसरातील हॉस्पिटल फिरूनसुद्धा एकही बेड शिल्लक नसल्यामुळे अखेर संतोष अवधूत ठोसर यांनी घरीच रविवारी पहाटे २ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
नागरिकांना बेड मिळत तसेच पालिकेच्या हेल्पलाईनदेखील नागरिकांची मदत करण्यास असमर्थ ठरत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
रमेश ठोसर म्हणाले, क्षेत्रीय कार्यालय नुसार त्या परिसरातील नागरिकांची व्यवस्था तातडीने होणे आवश्यक आहे. यासाठी पालिकेने नियोजन करणे आवश्यक होते. उपचाराअभावी नागरिकांचा मृत्यू होत असेल तर ही बाब दु:खद आहे.