लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाबाधित वाढीचा आकडा सोमवारी ३२८ इतका खाली गेला असताना, सोमवारी पुन्हा शहरात गत आठवड्यातील पुनरावृत्ती सुरू झाली असून, आज नव्याने दुप्पटीने म्हणजे ६८८ कोरोनाबाधित आढळून आले आहे़ आज दिवसभरात ६ हजार १२४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ११़२३ टक्के इतकी आहे़
दरम्यान, शहरातील सक्रिय रूग्णसंख्या (अॅक्टिव्ह पेशंट) पुन्हा ५ हजारांच्या पुढे गेली असून, शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही ५ हजार ९१ इतकी झाली आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ६२८ इतकी असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २७८ इतकी आहे़ दरम्यान, आज दिवसभरात ४९८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़
शहरात आजपर्यंत ११ लाख ५४ हजार ७८५ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ३ हजार ७९६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९३ हजार ८४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८६४ जणांचा मृत्यू झाला आहे़
==========================