सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सामाजिक अंतर व स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून पवित्र रमजान महिना घरीच साजरा करण्यावर मुस्लिम बांधवांनी भर दिला आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव ३० दिवस दररोज पहाटेपासूनच उपवास ठेवतात आणि संध्याकाळी मगरीबच्या नमाजपूर्वी उपवास सोडतात त्यानंतर ईशा नमाज व तराबीची नमाज मध्ये कुराण पठण केले जाते. रमजान महिन्यात २७ शब ( मोठी रात्र व कुराण समाप्ती ) या दिवशी सामूहिक दुवा पठाण करण्याची प्रथा आहे. परंतु यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये न जाता नमाज व दुवा पठण आपल्या घरातूनच करावी असे समाज बांधवांतर्फे आवाहन करण्यात आले असून, समाजबांधव याचे काटेकोर पालन करत आहेत.
पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईदची नमाज व ईद साजरा करण्याची प्रथा आहे. या निमित्त मुस्लिम बांधव तरावीहची नमाज संपण्यापूर्वी आपापल्या विभागातील मशिदीमध्ये पवित्र कुराण पठण आणि नमाज अदा करतात.
--
फोटो क्रमांक
फोटोओळी : कुरुळी (ता. शिरूर) येथे करोनाच्या प्रादुर्भावामुळे घरी नमाज पढताना सरपंच आरिफ पठाण व त्याचे कुटुंबातील सदस्य.