दौंंड : दौंड शहरातील एका सत्तर वर्षाच्या कोरोना संसर्ग असलेल्या रुग्णाचा पहाटेच्या सुमारास पुणे येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. या ज्येष्ठ रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णास तातडीने पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना मंगळवारी या ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरातील एका नव्वद वर्षाच्या वयोवृध्द महिलेला कोरोना झाला असल्याचे डांगे यांनी स्पष्ट केले.दौडं शहरात चार कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी यातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान शहरात आज नव्याने एका वृध्द महिलेचा आरोग्य चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने सध्य परिस्थितीत शहरात तीन कोरोनाचे रुग्ण आहे. तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ चे दोन जवान,आणि दौंडला वास्तव्यास असलेल्या भारतीय रिझर्व्ह बटालीयन गट क्र.१६ चे पंधरा जवान अशी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० झाली असून या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहे. दौंड शहरातील कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या ३२ पर्यंत गेली होती. मात्र, यातील काही रुग्ण उपचारा दरम्यान निगेटिव्ह झाल्याने कोरोना रुग्णाची संख्या घटली आहे.................................................पहिला रुग्ण निगेटिव्ह दौंड शहरात एक ८२ वर्षाच्या व्यक्तीला कोरोना झाला होता. ही ज्येष्ठ व्यक्ती शहरातील पहिला कोरोना रुग्ण होता. या रुग्णाला उपचारासाठी पुणे येथे पाठविले असता त्या व्यक्तीचा वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले.
दौंडमध्ये कोरोनाचा पहिला बळी; सत्तर वर्षीय रुग्णाचा मृत्यू, शहरातील बाधितांची संख्या २०
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 4:51 PM
शहरातील एका नव्वद वर्षाच्या वयोवृध्द महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट
ठळक मुद्देदौंड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ३२ पर्यंत गेली होती. मात्र, उपचारादरम्यान काही निगेटिव्ह