तुळापूर (ता. हवेली) शिवपूत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट व तुळापूर ग्रामस्थ यांच्या वतीने राज्याभिषेक सोहळा आयोजित केला होता.
प्रारंभी हर हर महादेव, जय भवानी-जय शिवाजी, संभाजी महाराज की जय असा जयघोष ढोलताशांचा निनाद.. भगव्या झेंड्यांची रेलचेल अशा
उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक सोहळा पूजा-अभिषेक, पालखी मिरवणूक आणि अभिवादन सभा अशा विविध कार्यक्रमाने उत्साहाने साजरा झाला. या वेळी ना. छगन भुजबळ बोलत होते.
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, विकास पासलकर, सोमनाथ भुजबळ, शंकर भूमकर, प्रदीपभाऊ कंद, आनिल भुजबळ, राधाकृष्ण सातव, दीपक गावडे, ज्ञानेश्वर शिवले, रुपेश शिवले, गणेश पुजारी, अमोल शिवले, लोचन शिवले आदी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, राजाचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे.
राज्याभिषेक सोहळा कार्यक्रम सुरू केला हे कौतुकास्पद आहे. तुळापूर नगरी मध्ये छत्रपती शंभुसृष्टी निर्माण केली पाहिजे.
येथील पर्यटनस्थळाचा विकास, तीर्थक्षेत्र ब दर्जा देणे, वाचानालय संग्रहालय मूलभूत सुविधा येथील चौफेर विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते करू. सरकार कमी पडणार नाही.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या की, संभाजीराजांच्या जीवन चरित्रा मधून संस्कार, संघर्ष , राजनीती, शौर्यनीती, माणसाला माणसासारखे कसे वागायचे आणि संस्कृती आपल्याला शिकता येऊन जतन करायची आहे, पुढे घेऊन जायची आहे.
आमदार अशोक पवार व
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री राज्याभिषेक सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट यावेळी
विविध )* पुरस्काराने गौरविण्यात आले * महाराणी येसूबाई गौरव पुरस्कार - अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड , (कला क्षेत्र )* * शंभुगौरव पुरस्कार - सावरगाव तंटामुक्त शिवजयंती समिती, (सामाजिक)* छत्रपती संभाजी समाज गौरव पुरस्कार - )* भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव समिती पुणे (सामाजिक)* )* ), * शंभुगौरव पुरस्कार - अनुपम मोरे, राजाराम निकम, योगेश भानुसे, तुळशीदास भोईटे (उद्योजक )* आदींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
_______________
क्षणचित्रे * सरदार येसाजी राजे कंक याचे वशंज सिध्दार्थ कंक व
सहका-र्यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या मूर्तीला दही-दुधाने व अकरा पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला. पालखी मिरवणूक झाली. वाद्यपथक व विविध मैदानी खेळ, भगवे झेंडे, पथक असे संगम चौक ग्रामपंचायत चौक मिरवणूक मार्गाने पालखी कार्यक्रमस्थळी आली. या वेळी जय भवानी-जय शिवाजी, संभाजीमहाराज की जय.. हर हर महादेव.. या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले यांनी स्वागत व प्रास्तविक केले, तर संतोष शिवले यांनी आभार मानले.
१) तुळापूर (ता. हवेली) छत्रपती संभाजी महाराज यांना अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अभिवादन केले यावेळी इतर मान्यवर
राज्याभिषेक
कार्यक्रम