Coronavirus : बारामतीनंतर आता मिशन पुणे, कोरोनाच्या लढाईसाठी दादांचा महत्वपूर्ण निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:32 PM2020-04-27T15:32:44+5:302020-04-27T15:33:31+5:30

पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

Coronavirus: After Baramati, now Mission Pune, Ajit Dada pawar's important decision for the battle of Corona in pune MMG | Coronavirus : बारामतीनंतर आता मिशन पुणे, कोरोनाच्या लढाईसाठी दादांचा महत्वपूर्ण निर्णय 

Coronavirus : बारामतीनंतर आता मिशन पुणे, कोरोनाच्या लढाईसाठी दादांचा महत्वपूर्ण निर्णय 

googlenewsNext

मुंबई -  पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.

अजित पवार हे आपल्या प्रशासकीय कामाच्या आणि रोखठोक स्वभावाने महाराष्ट्राला परिचित आहेत. काम म्हणजे कामच हेच अजित पवारांचे धोरण असते. कोरोनाविरुद्धच्या लढाईतही बारामती पॅटर्नच्या माध्यमातून अजित पवारांनी आपल्या प्रशासकीय कामाची आणि नेतृत्वाची चुणूक दाखवून दिलीय. आता, बारामतीनंतर मिशन पुणे हेच पालकमंत्री अजित पवारांचे लक्ष्य असल्याचे दिसून येते. त्यासाठी, 4 वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती पवार यांनी केली आहे. राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे आज यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त तर, कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे. हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहेत. 

या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या मुंबईनंतर पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेलं शहर बनलं आहे. 

Web Title: Coronavirus: After Baramati, now Mission Pune, Ajit Dada pawar's important decision for the battle of Corona in pune MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.