राजू इनामदार
पुणे: कोरोनामुळे घाबरून मानसिकद्रुष्ट्या खचलेल्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने (अंनिस) मनोबल हेल्पलाईन हा ऊपक्रम सुरू करण्यात आला आहे. परिवर्तन या संस्थेसह प्रयोगशील दिग्दर्शक अतूल पेठे, सामाजिक कार्यकर्ते राजू इनामदार यांच्यासह अनेकांचा या ऊपक्रमात सहभाग आहे
राज्यभरातून रोज १०० फोन संस्थेने जाहीर केलेल्या समुपदेशकांना येत असतात. त्यात प्रामुख्याने महिला, तरूण मुले, ऊद्योजक यांचा सहभाग आहे. समुपदेशकाच्या वतीने त्यांच्याबरोबर दुरध्वनी अथवा शक्य असेल तर प्रत्यक्ष भेटूनही भावनिक ऊपचार केले जातात.
इनामदार यांनी यासाठी कोरोना बाबत माहिती व.काळजी देणारे बोधगीत तयार केले आहे. त्याबरोबर डॉ. दाभोलकर यांनी भावनिक ऊपचार म्हणजे काय, ते कसे व का करायचे याची माहिती देणारे एक विवेचन तयार केले आहे. या दोन्हीची चित्रफित तसेच समुपदेशकाचा संवाद या माध्यमातून मानसिक द्रुष्ट्या खचलेल्या लोकांवर ऊपचार केले जात आहेत. डॉ. हमीद म्हणाले, आम्ही काय करतो आहोत असा प्रश्न काहीजणांकडून सातत्याने केला जात आहे. त्या वादात आम्ही कधी पडत नव्हतो व पडायचेही नाही. समाजाची गरज लक्षात घेऊन आमचे काम सुरू असते. कोरोना विषाणूच्या आघातामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे, अशा काळात मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्तींच्या त्रासात वाढ होते. संवेदनशील असणारे युवकयुवतीही या काळात मानसिक आजाराची शिकार होतात. त्यांना ऊभारी देण्यासाठी म्हणून हा मनोबल हेल्पलाईन ऊपक्रम सुरू केला आहे.
यात २० तज्ञ प्रशिक्षण समुपदेशक आहेत. त्यांना ५० पेक्षा अधिक मानस मित्रमैत्रिणींचे साह्य मिळते. या २० जणांचे मोबाईल दुरध्वनी क्रमांक ठिकठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत. अनिसच्या राज्यभरातील शाखांनाही त्याची माहिती देण्यात आली आहे. इच्छुक व्यक्ती किंवा तिचे नातेवाईक यावर संपर्क करू शकतात. नंतर त्यांच्या नजिक असलेल्या समुपदेशकाचा क्रमांक त्यांना दिला जातो. तिथे त्यांचा संपर्क झाला ते ऊपचार सुरू करतात. भावनिक ऊपचारांची शास्त्रीय पद्धत आहे. त्या पद्धतीनेच हे काम केले जाते. फारसा प्रतिसाद मिळणार नाही असेच सुरूवातीस वाटत होते. मात्र मिळालेल्या एकूण प्रतिसादावरून समाजमन अस्थिर असल्याचे स्पष्टपणे जाणवत असल्याचे डॉ. हमीद यांनी सांगितले. संस्थेकडून रूग्णाचे नाव अर्थातच गुप्त ठेवले जाते. त्यामुळे नावे प्रसिद्ध न.करण्याच्या अटीवर डॉ हमीद यांनी सांगितलेली ऊदाहरणे सामाजिक अस्वस्थता दाखवणारी आहेत.बुलढाणा इथून फोन केलेल्या एका महिलेला कोरोनाची इतकी दहवत बसली होती की सर्व जग आता बुडणार म्हणून ती भयभीत झाली होती व त्यातून तिचे घरातील वागणे त्रासदायक झाले होते. तिचे मनोबल वाढवून तिला या आजारातून बाहेर.काढण्यात आले असल्याची माहिती डॉ. दाभोलकर यांनी दिली. राज्यभरातून आमच्या समुपदेशकांना रोज किमान १०० फोन येत असल्याची माहिती त्यांनी दिली.संपर्कासाठी : रेश्मा कचरे: ९५६१९११३२०, योगिनी मगर: ९६६५८५०७६९