काटेवाडी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात घेण्यात आलेल्या अँटिजेन तपासणी मध्ये २३७ पैकी ५४ जण पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत काटेवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने प्राथमिक शाळेच्या आवारात हॉटपॉट सर्वे सह अँटिजन टेस्टच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरात काटेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अतर्गत सर्वेक्षण करून काटेवाडी कन्हेरी ' पिंपळी लिमटेक सह इतर गावातील झालेल्या रॅपिड चाचण्यांमध्ये २३७ जणाची तपासणी करण्यात आली.यामध्ये तब्बल ५४ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आलेले आहेत . या रुग्णावर उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मार्तंड जोरी यांनी दिली.
सकाळी दहा वाजता सुरू झालेली चाचणी दुपारी अडीच वाजता संपली. आजच्या कॅम्प मध्ये एकुण २३७ व्यक्तीची अँटिजेन तपासणी करण्यात आली.त्यामध्ये काटेवाडी गावातील पॉझिटिव्ह संख्या १९ ,ढेकळवाडी ७ , कन्हेरी चार व इतर गावातील २४ रुग्णाचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सरपंच विद्याधर काटे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले .