शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

Coronavirus : कोरोनामुळे पुण्यातील काही शाळांकडून परीक्षेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 8:28 PM

आजारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा असली तरी शाळेत न येण्याचा दिला सल्ला

ठळक मुद्देइंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून कोरोनाबाबत काळजी; विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही शाळांनी आपल्या परीक्षा लवकर घेतल्या आहेत, तर काही शाळांनी आजारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा असली तरी शाळेत न येण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मास्क घालूनच शाळेत यावे, अशाही सूचना काही शाळांकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून कोरोनाबाबत काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.विद्यार्थी व पालकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती केली जात असून, आजारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, अशा स्पष्ट सूचना इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. त्यातच कात्रज परिसरातील आर्यन शाळेने आपल्या परीक्षा काही दिवस लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बिशप शाळेने शक्यतो विद्यार्थ्यांनी मास्क घालून शाळेत यावे, असा सूचना दिल्या आहेत.दरम्यान, सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील पवार पब्लिक स्कूलने आजारी असल्यास विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, तसेच आजारी असणाºया विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबतही काळजी करू नये, असे लेखी पत्र काढले आहे. तर ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, नर्सरी व पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत बुधवारपासून सुट्टी दिल्याचे पालकांना कळविले आहे.--प्रामुख्याने ज्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचे परदेशात जाणे-येणे असते, अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसह आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच आर्यन शाळेने आपल्या परीक्षा लवकर घेतल्या असून, बिशप शाळेने विद्यार्थ्यांना मास्क घालून शाळेत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्व शाळांनी आपली स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, असे संघटनेतर्फे सर्व शाळांना कळविले आहे. - राजेंद्र सिंग, कार्याध्यक्ष, इंडिपेंन्डेट इंग्लिश स्कूल असोसिएशन--कोरोनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती केली असून, प्राथमिक व माध्यमिक वर्गाच्या परीक्षा काही दिवस अगोदर घेतल्या जात आहेत. परीक्षा संपल्यानंतरही शैक्षणिक वर्षाचा कालावधी संपेपर्यंत शाळा सुरूच ठेवली जाणार आहे. कोरोनामुळे कोणती परिस्थिती ओढवणार आहे; याबाबत सध्या कोणतीही कल्पना नसल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ दिवस लवकर घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार काही वर्गाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत.- मिलिंद लडगे, संचालक, आर्यन स्कूल, कात्रज 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाexamपरीक्षाcorona virusकोरोना