पिंपरी : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढल्याने पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भोसरी येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील एक रुग्णाने पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यात १६ कोरोनाबाधित असून, त्यात पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ रुग्ण आहेत. विभागीय आयुक्तांकडून कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाबाबत दररोज आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार कोरोनाबाधित व संशयितांबाबत आकडेवारी स्पष्ट करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. भोसरी येथे स्वतंत्र कक्षात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र येथील एका रुग्णाने शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयातून पलायन केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासन व पोलिसांची धावपळ झाली. पोलिसांनी रुग्णाला ताब्यात घेतले. तसेच रुग्णवाहिकेतून त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार गर्दी टाळण्याचे आवाहन पोलिसांकडूनही करण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी पाहणी करण्यात येत आहे.
Coronavirus : कोरोनाच्या रुग्णाने ठोकली हॉस्पिटलमधून धूम; पुन्हा ताब्यात घेताना प्रशासनाची दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 6:45 PM