पुणे - ससून रुग्णालयातील मृतांमध्ये सोमवारी आणखी एका रुग्णाची भर पडली. कोंढवा येथील 57 वर्षीय महिलेचा दुपारी कोरोनामुळे मृत्यू झाला. तिचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रात्री उशिरा तिला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला.
ससून रुग्णालयामध्ये वाढत्या मृत्यूमुळे डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आली. मात्र त्यानंतरही मृत्यूचे सत्र थांबलेले नाही. सोमवारी मृत्यू झालेली महिला 19 एप्रिलला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात आली होती. त्यावेळी तिची प्रकृती गंभीर होती. कोरोना सदृश लक्षणे असल्याने तिचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पण त्याचा अहवाल येण्यापूर्वीच सोमवारी दुपारी मृत्यू झाला. रात्री उशिरा रुग्णालयाला मिळालेल्या अहवालामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ठ झाले. या महिलेला निमोनिया झाला होता. तसेच तिला मधुमेहही होता. त्यामुळे ससूनमधील मृतांचा आकडा 43 वर गेला असून शहरातील मृत्यू 54 झाले आहेत.
सोमवारी रात्री पिंपरी चिंचवड मधील एकाच पुण्यातील कमांड हॉस्पिटमध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 56 वर गेली आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड 2 आणि बारामतीतील एका व्यक्तीचा समावेश आहे. तसेच ठाणे आणि नगर मधील प्रत्येकी एकाचा मृत्यू पुण्यात झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ... तर चीनला मोठा फटका बसणार, तब्बल 1000 कंपन्या भारतात येणार
Coronavirus : चिंताजनक! देशात 24 तासांत 1,336 नवे रुग्ण, 47 जणांचा मृत्यू
Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरली