पुणे : पुण्यातील काेराेनाबाधितांची संख्या वाढत असताना गेल्या 24 तासात पाच काेराेनाबाधितांचा मृत्यू पुण्यात झाला आहे. त्यामुळे पुण्यात काेराेनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 13 वर जाऊन पाेहचली आहे.
हाेळीच्या दिवशी पुण्यात पहिला काेराेनाबाधित रुग्ण आढळून आला हाेता. त्यानंतर हळूहळू ही संख्या वाढत गेली. सध्या पुण्यात 159 काेराेनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. नायडूमध्ये दाखल असलेल्या 44 वर्षाच्या पुरुषाला काेराेनाची लागण झाली हाेती. त्याचबराेबर त्याला डायबेटिस देखील हाेता. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले हाेते. परंतु उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तर दुसरीकरडे नाेबेल हाॅस्पिटलमध्ये एका 73 वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याला देखील व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले हाेते. या रुग्णाने कुठलाही परदेश दाैरा केला नव्हता. तसेच कुठल्याही काेराेनाबाधित रुग्णाशी त्याचा संपर्क आला नव्हता. एका 50 वर्षीय महिलेचा तसेच इतर दाेन रुग्णांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
दरम्यान पुण्यातील काेंढवा भागापासून संगमवाडी आरटीओचा परिसर पाेलिसांनी सील केला असून नागरिकांच्या हालचालींवर कडक निर्बंध ठेवण्यात येत आहेत.