निरा नरसिंहपूर : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध पावले उचलली असून त्यात मंदिरे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून मुंबईच्या सिध्दीविनायक , तुळजाभवानी देवी मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर,शेगावचे गजानन महाराज यांसारख्या अनेक देवस्थानांनी भाविकांना मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर निरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नृसिंह मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. निरा नरसिंहपूर येथे देवस्थानने बैठक आयोजित केली होती. त्यावेळी कोरोनाची भीतीमुळे लक्ष्मी - नृसिंह मंदिर व अन्नछत्र बंद करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. भक्तांना देण्यात येणाऱ्या खोल्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत.तसेच मंदिरातील धार्मिक विधी (देवाची पूजा सोडून ) बंद ठेवण्यात आले आहेत,अशी माहिती मंदिराचे जनसंपर्क अधिकारी नारायण दंडवते यांनी दिली. नीरा नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व सुधाकर गोविंद दंडवते कनिष्ठमहाविद्यालय, शिवपार्वती इंग्लिश मिडियम स्कूल, माध्यमिक विद्यालय गिरवी,लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय पिंपरी बुद्रुक तसेच सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना दिनांक १६ ते ३१ मार्च दरम्यान शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतला आहे.तर नीरा नरसिंहपूर, पिंपरी बुद्रुक येथील दोन आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवकांनी घेतला आहे.रस्त्यावर शुकशुकाट जाणवत असून व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसतआहे. त्यामुळे स्वयंघोषित संचारबंदी लागू झाल्याचे चित्र सर्वत्र दिसूनयेत आहे.
Coronavirus : निरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नृसिंह मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 4:18 PM
निरा नरसिंहपूर : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध पावले उचलली असून त्यात मंदिरे ...
ठळक मुद्देकोरोनाची भीतीमुळे लक्ष्मी - नृसिंह मंदिर व अन्नछत्र बंद