पुणे - शहरामध्ये सुरू असलेला लाॅकडाऊन प्रशासनाने रविवारपासून काही प्रमाणात शिथिल केला आहे. यामध्ये जीवनावश्यक गोष्टींची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील गुळ व भुसार बाजार सोमवारपासून प्रशासनाने दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहणार असल्याचे दि पुना मर्चंट चेंबरच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि हवेली मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये 14 जुलै ते 23 जुलै दरम्यान दहा दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. यात पहिल्या पाच दिवसांत भाजीपाला व किराणामाल देखील विक्रीस परवानगी नव्हती. यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील गुळ-भुसार व भाजीपाला, फळे, कांदा व बटाटे विभाग देखील पाच दिवसांपासून बंद आहे. केंद्र शासनाच्या सर्व लाॅकडाऊनमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सर्व जोखीम पत्करून मार्केट यार्डातील भुसार बाजार चालू होता. परंतु महापालिका आयुक्त यांनी काढलेल्या लाॅकडाऊनच्या आदेशत प्रथमच भुसार बाजार देखील बंद ठेवण्यात आला.
आता रविवार 19 जुलै पासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये वेळ केवळ सकाळी 8 ते दुपारी 12 ही देण्यात आली आहे. परंतु या वेळेत वाढ करून देण्याची मागणी दि पुना मर्चंट चेंबरच्या वतीने आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. परंतु अद्याप प्रशासनाने वेळेत वाढ करून दिलेली नसल्याने सोमवारपासून सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत गुळ व भुसार बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मर्चंट चेंबरच्या वतीने कळविण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Aadhaar संबंधित प्रश्न असल्यास आता नो टेन्शन! Tweet करताच मिळणार उत्तर
लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 18 जखमी
CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती
'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल
"कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या", भाजपा नेत्याचा अजब सल्ला