पिंपरी - पिंपरी येथील संभाजीनगर येथे राहणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांला डिस्चाज॔ देण्यात आला. या रुग्णांचे नागरिकांनी हार-फुले, ढोल-ताशे वाजवून स्वागत केले होते. फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार गोविंद गुरव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगरसेविका मंगलाताई कदम( रा . संभाजीनगर, अमेय सुधीर नेसरकर (रा . संभाजीनगर) कल्पेश गजानन हाने (रा . सम्राट हौ . सोसा . संभाजीनगर), संतोष शिवाजी वराडी यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील एका नामवंत रुग्णालयात नोकरी करत असणाऱ्या एका नर्सला व तिच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. हे दोघेही पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान या दोघांचा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यामुळे हे दांपत्य आपल्या पिंपरी चिंचवड शहरामधील संभाजीनगरमधील घरी आले. येथील रहिवाशांचे वेगळेच रूप त्यांना पहावयास मिळाले. येथील रहिवाश्यांनी चक्क या दाम्पत्यांचे फुले उधळून, ढोल-ताशाच्या गजरात व औक्षण करून स्वागत केले. यावेळी स्थानिक नगरसेविका आणि माजी महापौर मंगला कदम यांनी त्यांचे औक्षण केले होते. याप्रकरणीराष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : देशात 75,000 व्हेंटिलेटर्सची आवश्यकता, कोरोनाग्रस्तांची संख्या 35,043 वर
लवकर उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मे महिन्यात 12 दिवस बँक बंद राहणार
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना चाचणी करण्यास सांगितले, संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापले
CoronaVirus News : जगाला कोरोनाचा विळखा! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?
Zoom अॅपचा वापर करता?, मग असा ठेवा आपला डेटा सुरक्षित