शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

CoronaVirus News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खिडकी योजना आणावी; आरोग्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 7:48 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

पुणे - कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा व सोलापूर जिल्हयात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने सुरू असलेल्या उपाययोजनाबाबत ससून रुग्णालयात आज आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे, निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ.सुभाष साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.

आढावा बैठकीत विभागातील तसेच पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदाची भरती तातडीने करावी,  कारोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावात. तसेच कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, कोरोना बाधित रुग्णांना उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस तसेच वार्डमधील सफाई कामगार यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावात, विलगीकरण कक्षातील नागरिकाला जेवण, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालय आणि परिसरातील स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावेत.  भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवूनच जास्तीत बेडची सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिल्या.

आरोग्यमंत्री टोपे यांना आढावा बैठकीत विभागातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी माहिती दिली. पुणे महानगरपालिका क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनाच्या संदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. गायकवाड  यांनी तसेच पुणे जिल्ह्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी श्री. राम आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद यांनी माहिती दिली. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी अद्यावयत माहिती दिली. ससून रुग्णालयाच्या सोयीसविधा तसेच पदाबाबतची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे यावेळी माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली; 11,706 जणांनी लढाई जिंकली

CoronaVirus News : धक्कादायक! एकामुळे तब्बल 55 कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण, 'हे' आहे कारण

CoronaVirus News : संतापजनक! मजूर दाम्पत्याला शौचालयात केलं क्वारंटाईन, फोटो व्हायरल 

CoronaVirus News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता घरबसल्या शेतमालाची विक्री, सरकारने लाँच केलं अ‍ॅप

CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव

CoronaVirus News : दारुसाठी काय पण! तळीरामांना सोशल डिस्टंसिंगचाही विसर, पोलीस आले अन्...

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे