पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असतानाही रूग्ण पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाही. रविवारी (दि.19) रोजी एका दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या 57 ने वाढ झाली. यामुळे जिल्हाचा कोरोना बाधित रुग्णांची संख्या 669 वर जाऊन पोहचली. दरम्यान रविवार कोरोनामुळे एकाही व्यक्तींचा मृत्यू झाला नाही ही चांगली बाब म्हणावी लागेल.राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहेत. यामुळे सध्या पुणे जिल्हा कोरोनाच्या रेड झोन मध्ये असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासना सोबत बैठक घेऊन जिल्हाचा आढावा घेतला. पुणे जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या व मृत्यु दर कमी करण्यासाठी त्यांना प्रशासनाला कडक उपाययोजना लागू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यात सोमवार (दि.20) पासून पुढील किमान एक आठवडा अत्यंत कडक निर्बंध घातले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत. ----- पुणे जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्यापुणे शहर : 562पिंपरी चिंचवड : 54पुणे ग्रामीण : 50एकूण मृत्यु : 50
CoronaVirus: पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या पोहचली 669 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 11:46 PM