पिंपरी : पुण्यातील एनआयव्हीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील पाच रुग्णांचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला असून त्यातील चार जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आहे. तर एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या ११ वर गेली आहे. तर नव्याने १२ व्यक्तींचे कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष तयार केला आहे.आजपर्यंत एकूण ९२ व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी उपचारार्थ दाखल अकरा रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. बुधवारी १२ व्यक्तींचा घश्यातील द्रावाचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठविले आहेत. तपासणीसाठी पाठविलेल्या पाच रुग्णांपैकी चार जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह तर एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.तो आला होता फिलिपीन्स मधून पुण्यातह्यह्यकोरोना पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा फिलिपीन्स येथून प्रवास करून पुण्यात आला होता. त्यांच्या सहवास आलेल्या नागरिकांची माहिती घेवून त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याची कार्यवाही सुरु केली आहे, असेही हर्डीकर म्हणाले.........................
बालेवाडीतील क्रीडा संकुलात ५०० जणांची व्यवस्था हर्डीकर म्हणाले, कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपाययोजना सुरू असून जिल्हा प्रशासन आणि महापालिकांच्या वतीने पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पाचशे जणांच्या क्वारंटाईनची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे.