शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Coronavirus: जगभरातील एक लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त; सर्व जगाने एकत्रित लढा देण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 3:44 AM

भारत, चीन, जपान, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, रशिया, इटली, जर्मनीसह २० देशांचा समावेश असलेल्या जी-२० देशांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

पुणे : जगभरातील तब्बल २०२ देशांमधे कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव झाला असून, पाच लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनावर कोणताही प्रभावी उपचार नसला तरी सध्या उपलब्ध असलेल्या औषधांवरच १ लाख रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूटीओ) महासंचालक टेड्रॉस घेब्रेयेसूस यांनी बरे झालेल्या रुग्णांचा आकडा जाहीर केला आहे.

भारत, चीन, जपान, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, रशिया, इटली, जर्मनीसह २० देशांचा समावेश असलेल्या जी-२० देशांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. ‘जगभरात पाच लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून, २३ हजारांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मात्र, आशेची बाब म्हणजे एक लाख रुग्ण बरेदेखील झाले आहेत. मानवतेच्या या शत्रूविरोधात सर्व देशांनी मिळून एकत्र लढा देण्याचे आवाहन घेब्रेयेसूस यांनी केले.

जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी पाहणी अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, चीनमधे नवीन कोरोनाबाधितांचा आकडा ११७ पर्यंत खाली आला. मात्र, युरोपात इटली, स्पेन व जर्मनीमधे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण तब्बल सहा ते आठ हजार इतके प्रचंड आहे. फ्रान्स, ब्रिटन, स्वित्झर्लंड, नेदरलँड, आॅस्ट्रिया, बेल्जियम, तुर्कीमधे १ ते २ हजार नवीन रुग्णांची भर पडली. अमेरिकेतही तब्बल ४,७००हून अधिक नवे रुग्ण आढळले. चीन नंतर युरोपात आणि अमेरिकेत कोरोना हाहाकार माजवत असल्याचे दिसून येत आहे.जागतिक आरोग्य संघटनेला १०८ दशलक्ष डॉलरची मदत

कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. अवघ्या दोन आठवड्यात ‘एकता निधी’मधे २ लाख ३ हजार व्यक्ती-संस्थांनी तब्बल १०८ दशलक्ष डॉलरची मदत दिली आहे.

सुरक्षा पोषाखाची कमतरता

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेला सुरक्षा पोषाख आणि उपकरणांची टंचाङ्मई जाणवू लागली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आत्तापर्यंत तब्बल २ दशलक्ष वस्तू ७४ देशांमधे पाठविल्या असून, ६० देशांमधे या वस्तू पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जर आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य ठीक असेल, तर प्रभावी उपचार करणे शक्य आहे. पुढारलेल्या देशांप्रमाणेच मागास देशांमधे देखील त्याच दर्जाची सुरक्षा उपकरणे पाठविणे गरजेचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.चाचणी क्षमता वाढवावी लागेल

रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने चाचणीची क्षमता वाढविण्याची गरज असून, चाचणीचा कालावधी देखील कमी करावा लागणार आहे. त्याच जोडीला कोरोनाचे निदान लवकर होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, रुग्ण निश्चित झाल्यानंतर त्याला तत्काळ विलग करणे, त्याच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून वेगळे काढणे या गोष्टी अधिक वेगाने कराव्या लागतील.कोरोनाची जगभरातील सद्य:स्थिती (२८ मार्च २०२०)

कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्ती ५,१२,७०१मत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २३,४९५कोरोना बाधित देश २०२२७ मार्च अखेरची सर्वाधिक कोरोना बाधित देशातील स्थितीदेश एकूण बाधित नवीन बाधित एकूण मृत्यूचीन ८२,०७८ ११७ ३२९८रिपब्लिक कोरिया ९,३३२ ९१ १३९आॅस्ट्रेलिया २,९८५ १८६ १३इटली ८०,५३९ ६,१५३ ८,१६५स्पेन ५६,१८८ ८,५७८ ४,०८९जर्मनी ४२,२८८ ५,७८० २५३फ्रान्स २८,७८६ ३,८६६ १,६९५ब्रिटन ११,६६२ २,१२९ ५,७८थायलंड १,१३६ २०२ ५भारत ७२४ ७५ १७अमेरिका ६८,३३४ ४,७६४ ९९१इराण २९,४०६ २,३८९ २,२३४(स्त्रोत : जागतिक आरोग्य संघटना पाहणी अहवाल)जागतिक आरोग्य संघटनेचे आवाहन- बाधित व्यक्तीला शोधून दुसºया व्यक्तीला होणारी लागण टाळण्यावर भर द्या- प्राण्यांकडून रोगाचा प्रसार होणार नाही याची दक्षा घ्यावी- जनतेला सातत्याने धोक्यांची जाणीव करुन द्या, योग्य माहिती पोहचवा आणि अफवा टाळा- सामाजिक आणि आर्थिक हानी कमी करण्यासाठी काम करागेल्या चोवीस तासांतील जगातील स्थिती (नवीन बाधित-मृत संख्या)बाधित ५,०९,१६४ (४६,४८४)मृत्यू २३,३३५ (२५०१)युरोपातील बाधित २,८६,६९७ (३६,४१४)युरोपातील मृत १६,१०५ (२,१५५)----------------------अमेरिकेत कोरोना बाधितांचा आकडा लाखांवरअमेरिकेमधे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, देशातील बाधितांचा आकडा लाखावर गेला असल्याचे वृत्त युएसए टुडे या वृत्तपत्राने दिले आहे. कोरोना बाधितांची संख्या लाखावर गेलेला अमेरिका पहिला देश ठरणार आहे. ज्या चीनमधून कोरोनाची सुरुवात झाली तेथेही बाधितांचा आकडा ८२-८३ हजारादरम्यान स्थिरावला आहे. अमेरिकेमधे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यानंतर बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते आठवडाभरापुर्वी देशातील बाधितांचा आकडा १० हजारांच्या आसपास होता. मात्र, चाचण्यांची संख्या वाढल्यानंतर त्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी रात्री बाधितांचा आकडा ८३ हजारांच्या वर गेला. आता बाधितांची संख्या एक लाखावर गेली असल्याचे युएसए टुडेने म्हटले आहे. अमेरिकेमधे २९ फेब्रुवारी रोजी पहिल्या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला होता. एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ हजार ५४४ इतकी आहे.कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ट्रस्ट देणार पाचशे कोटीपुणे : देशासह जगभरातील विविध ठिकाणी पसरत असलेल्या कोरोना विषाणूशी लढण्यासाठी टाटा ट्रस्ट पाचशे कोटी रुपयांचा निधी देणार आहे. त्यातून आरोग्य सुविधा बळकट करण्यात येणार असून, कोरोना चाचणीची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे टाटा उद्योग समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी सांगितले.

कोरोनाचा जगभर होत असलेला फैलाव ही अत्यंत आपत्तीजनक स्थिती आहे. त्या विरोधात तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे. टाटा समुहाच्या माध्यमातून देशाला आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांची उभारणी केली जाईल. अत्यंत खडतर कालावधीमधून जग जात आहे. तातडीच्या अशा सुविधांच्या उभारणीसाठी सर्वांनी मदत केली पाहीजे. टाटा ट्रस्ट त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी देईल.

आरोग्य सेवा पुरविणाºया व्यक्तींसाठी सुरक्षा पोषाख आणि इतर आवश्यक उपकरणे दिली जातील. रुग्णांवर उपचारासाठी लागणारी कृत्रीम श्वासोच्छवासाची यंत्रणा आणि कोरोना चाचणी करण्यासाठी किट उपलब्ध करुन देण्यात येईल. या शिवाय आरोग्य कर्मचाºयांना प्रशिक्षण देणे आणि सामान्य नागरिकांमधे जागृती करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट, टाटा सन्स आणि टाटा उद्योग समुहातील विविध कंपन्या एकत्रित प्रयत्न करणार आहेत.लस उपलब्ध होण्यासाठी लागेल एक ते दीड वर्ष

जगभरात कोरोना विषाणूवर लस शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार त्यासाठी किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल. त्यामुळे सध्याच्या रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार पद्धत वापरून त्यांचा जीव वाचविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. नॉर्वे आणि स्पेनमधे वेगवेगळ्या चार औषधांची मात्रा कोरोनावर लागू होते की नाही, तसेच काही औषधसमूह कसा लढा देतात, याची चाचणी घेतली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतchinaचीन