शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

CoronaVirus Positive News : पुणे शहरात तपासणी वाढली तरी "कोरोना पॉझिटिव्ह" ची टक्केवारी घटली             

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 6:00 AM

कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८० टक्के 

ठळक मुद्देकेवळ कोरोनामुळेच मृत्यू झाला असा एकही जण नाही सध्या पुणे शहरात शहरातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांचा वयोगट हा २० ते ४० कोरोनाबाधित रूग्णांपैकी पालिकेने जाहिर केलेल्या ६९ कंटन्मेंट झोनमधीलच ९० ते ९२ टक्के रूग्ण

निलेश राऊत-पुणे : पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून नागरिकांच्या स्वाब तपासणीचे प्रमाण दुप्पटीने वाढले असले तरी, यापैकी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत दररोज साधारणत: ५०० ते ६०० जणांचे स्वाब तपासण्यात येत होते, त्यापैकी पॉझिटिव्ह अहवालाची टक्केवारी ही १३़५ टक्के इतकी होती.मात्र, आता दररोज १५०० ते १६०० स्वाब तपासणी होत असून, यातील पॉझिटिव्ह अहवालचे प्रमाण  साधाणत: ९ ते १० टक्के इतकेच आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधितांपैकी कोरोनामुक्त होण्याची टक्केवारीही ८० टक्क्यांच्यावर गेल्याची सकारात्मक बाजू समोर आली आहे.     महापालिका प्रशासनाकडून शहरातील ६९ कंटन्मेंट झोन वगळता अन्य भाग काही निर्बंध घालून दैनंदिन व्यवहारासाठी घेऊन खुले करण्यात आले. या निर्णयाचे बहुतांशी जणांनी स्वागतही केले, तर काहींनी ही शिथिलता कोरोनाच्या संसर्गाला आमंत्रण देणारी असल्याची भावनाही व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडील कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहता, शहरातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांपैकी पालिकेने जाहिर केलेल्या ६९ कंटन्मेंट झोनमधीलच ९० ते ९२ टक्के रूग्ण असल्याचे दिसून आले आहे. ११ मे पर्यंत सर्वाधिक कंटन्मेंट झोन असलेल्या क्षेत्रिय कार्यालयांपैकी भवानी पेठ येथे ५११, ढोले पाटील रोड येथे ४०९, घोले रोड येथे ३२६, कसबा-विश्रामबाग येथे ३१९ व येरवडा धानोरी येथे २९४ रूग्ण आढळून आले आहेत.     संपूर्ण शहरातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांचा वयोगट हा २० ते ४०  हा असून, याला महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्याकडून लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरण्याचे प्रमाण किंवा फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करणे हेच असल्याचे आढळून आले आहे़.    महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत, त्यांच्यापैकी ८० टक्के रूग्ण हे खात्रीशीर कोरोनामुक्त होणारे आहेत. तर उर्वरित १५ टक्के रूग्ण हे तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेले, किंबहुना जास्त काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागणारे आहेत. परंतू, ज्या रूग्णांचा मृत्यू होत आहे ते अन्य आजाराने पहिल्यापासूनच त्रस्त असलेलेच आहेत. केवळ कोरोनामुळेच मृत्यू झाला असा एकही जण सध्या पुणे शहरात नाही. एकंदर कोरोनाबाधितांची एकूण संख्या व कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण पाहता मृत्यूचे प्रमाण हे अतिशय कमी असल्याचे आढळून आले असून, ही टक्केवारी एकूण कोरोनाबाधित संख्येशी तुलना करता साधारणत: ५़२ टक्के इतकीच आहे.         मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुणे शहरात पहिला कोरोनाचा रूग्ण आढळून आला. तो आकडा आजमितीला ( ११ मेपर्यंत ) २ हजार ५८२ वर गेला आहे. परंतू, यापैकी ४२ टक्के रूग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर उर्वरित १ हजार ३३५ रूग्णांवर उपचार चालू असून, यापैकी केवळ ७.३ टक्के रूग्णांची प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार सुरू आहेत. -----------------रूग्ण वाढीचा वेग साधारणत: एकास तीन असा पुणे शहरात ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ असे बहुतांशी रूग्ण हे दाट वस्तीतील आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या साधारणत: तीन व्यक्तींना याची लागण होते हे अनेक केसेसमध्ये देशातही दिसून आले आहे. त्यानुसार कोरोना रूग्ण वाढीचे प्रमाण एकास तीन असे गृहित धरले गेले आहे. त्यानुसार सद्यस्थितीला पुणे शहरात २ हजार ५०० च्या वर कोरोनाबाधित असले तरी, त्यांच्यामुळे अंदाजे साडेसात ते आठ हजार नागरिक बाधित झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच गणितीय शास्त्रानुसार प्रशासनाने दहा हजार खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. परंतू, गेल्या काही दिवसांपासून रूग्णांच्या दुप्पटीचा कालावधी हा ८ दिवसांवरून १२ दिवसांवर आला आहे. त्यातच ज्या ठिकाणी रूग्ण सर्वाधिक आढळून येत आहे. तो भाग सोमवारपासून पूर्णपणे सील केल्यामुळे हा संसर्ग रोखण्यासही मोठी मदत मिळणार असल्याचा प्रशासनास विश्वास आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या