शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

CoronaVirus Positive News : देशातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ३१ टक्के तर पुण्याचे ४९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 4:44 PM

देशातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ३१ टक्के असून पुण्याचे ४९ टक्के

ठळक मुद्देगेल्या आठवड्याभरातील आकडेवारी पाहिली तर एक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी आतापर्यंत १३७७ रुग्ण कोरोनामुक्तमृत्यूचा आकडा आठवड्याभरापासून दहाच्या खालीच

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जरी २ हजार ८२४ झाली असून प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह (प्रत्यक्षात उपचार घेत असलेले) १ हजार २८४ रुग्ण आहेत. गेल्या आठवड्याभरातील आकडेवारी पाहिली तर एक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. यासोबतच मृत्यूदर स्थिर ठेवण्यातही यश आले असून आठवड्याभरापासून मृत्यूचा आकडा सरासरी ६ एवढा असून हा दर स्थिर राहिला आहे. आतापर्यंत १३७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हा आकडा ४९ टक्के एवढा आहे.शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. विशेषत: भवानी पेठ, शिवाजीनगर-घोले रस्ता, ढोले पाटील रस्ता, येरवडा-कळस-धानोरी आणि कसबा-विश्रामबाग या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहेत. हे प्रमाण वाढतच चालले आहे. शहरातील या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील अति संक्रमित भाग पूर्णपणे सील करण्यात आला असून याठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. प्रभावी उपचारांद्वारे रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ३१ टक्के असून पुण्याचे ४९ टक्के आहे. ही सकारात्मक बाब असून आजवर कोरोनामुक्त झालेले रुग्ण जुन्या डिस्चार्ज पॉलिसीनुसार सोडण्यात आलेले आहेत. यापुढे नवीन डिस्चार्ज पॉलिसीप्रमाणे रुग्ण घरी सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर, ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  ======आठवड्यातील रुग्णांचा तपशील

तारीख           एकूण रुग्ण        डिस्चार्ज         एक्टिव्ह            बरे झालेले (एकूण)06 मे              2029                  52                 1297                  58707 मे               2146                   84                1350                 67108 मे               2245                  61                 1377                  73209 मे               2380                 96                 1414                  82610 मे               2482                 194                1318                 102011 मे               2573                   69                 1335                 108912 मे              2737                   120                1372                120913 मे              2824                   168                1284                1377

  

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या