पुणे : कोरोना काळात जैव वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढले असून दिवसाला सरासरी सहा हजार किलोपेक्षा अधिक कोरोनाचा कचरा निर्माण होत आहे. तर, अन्य वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण आठ हजार किलोपेक्षा अधिक आहे. हा जैविक कचरा इनसिनीरेटरमध्ये जाळला जात आहे. मास्कचा वापर वाढल्याने हा कचराही मोठ्या प्रमाणावर जमा होत असून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जात आहे.
पालिकेने एका कंपनीसोबत करार केलेला असून या कंपनीच्या इन्सिनरेटरमध्ये हा कचरा जाळून नष्ट केला जात आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. शहरात सद्यस्थितीत जवळपास ५३ हजार रुग्ण गृह विलगिकरणात आणि प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांवरील उपचारांमधून निर्माण होणा-या कच-यासह पीपीई किट्स, जेवणाची ताटे व अन्य साहित्य असा सहा ते सात टन कचरा दिवसाकाठी निर्माण होत आहे. ----डॉ. नायडू रुग्णालयाजवळील कैलास स्मशानभूमीजवळ असलेल्या या कंपनीवर सध्या वाढलेल्या जैविक कच-यामुळे ताण वाढला आहे. आवश्यकता भासल्यास तळोजा कोरोनाचा कचरा पाठविला जातो. हा कचरा पाठविण्याकरिता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली आहे. शहरातील प्रकल्पाची क्षमता चार हजार किलो कच-याची आहे. त्याची पूर्णत: सुरक्षितपणे आणि वैज्ञानिकदृष्ट्या विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.======वापरलेल्या मास्कचे काय केले जाते रे भाऊ?रुग्णालयांमध्ये वापरलेले मास्क कोविड काचऱ्यासोबतच गोळा केले जातात. यासोबतच गृह विलगिकरणात असलेल्या रुग्णांचा कचरा उचलण्याची पालिकेने व्यवस्था लावलेली आहे. हा कचरा वेगळा ठेवला जातो. हा कचरा इनसिनीरेटरमध्ये जाळला जातो. -------शहरात रोज निघणारा कचरा - २१०० मेट्रिक टनओला कचरा - ९०० मेट्रिक टनसुका कचरा - १२०० मेट्रिक टॅनरूग्णालयांमधून निर्माण होणारा कचरा - १४ मेट्रिक टन------रुग्णालयांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण १४ टन आहे. यामध्ये कोविडचा कचरा सहा टन तर कोविड व्यतिरिक्त अन्य वैद्यकीय कचरा आठ टनांपर्यंत जमा होतो. या कचऱ्याची बंदिस्त वाहनांमधून वाहतूक केली जाते. हा कचरा रस्त्यावर वा अन्यत्र पडू नये याची खबरदारी घेतली जाते. हा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने जाळला जातो.-------शहरात दिवसाला सहा ते सात टन कोविड कचरा जमा होत असून अन्य वैद्यकीय कचराही आठ टनांपर्यंत निर्माण होत आहे. हा कचरा इनसिनीरेटरमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने जाळला जातो. दिवसाला चार हजार टन कचरा नष्ट केला जात आहे. - डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका