पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी ९ हजार ८४१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ९ हजार १८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पुणे शहरात गुरुवारी ४ हजार ५३९ तर पिंपरीत २ हजार ५३९ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तसेच पुणे शहरात ४ हजार ८५१ तर पिंपरीत २ हजार १५६ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्ह्याची सक्रिय कोरोना १ लाख १ हजार ९१६ झाली असून त्यात ७३ हजार ८०२ हॉस्पिटलमध्ये तर २८ हजार ११४ गृह विलगिकरणात आहे.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ हजार ८८२ झाली आहे. तर शहरात संख्या ६ हजार ४९९ झाली आहे.
पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६ लाख ४९ हजार ५६५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ७ लाख ६३ हजार १९४ झाली आहे.
.......
पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
पुणे : शहरात गेल्या चार दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात २२ हजार २७७ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २०.३७ टक्के इतकी आहे.
दरम्यान आज दिवसभरात सर्वाधिक म्हणजे ८० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २४ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १़६३ टक्के इतका आहे.कोरोनाबातिधांची वाढती संख्येनुसार शहरातील मृत्यूदर कमी होत असला तरी, गेल्या दहा दिवसात शहरातील कोरोनाबाधितांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार २११ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३१३ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत १९ लाख ६८ हजार ५१४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ८७ हजार ३० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख २९ हजार १४८ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५१ हजार ५५ इतकी झाली आहे.
---------------------------------
रूग्णसंख्या कमी होऊनही बेड मिळेना....
शहरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या वाढीच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.अशावेळी शहरातील विविध रूग्णालयांमधील खाटा रिक्त होणे अपेक्षित होते. मात्र तसे अद्यापही झालेले नाही. सद्यस्थितीला सौम्य लक्षणे असलेले व होम आयसोलेशेनमध्ये (गृह विलगीकरणात) असलेले कोरोनाबाधित १७ दिवसानंतर कोरोनामुक्त झाल्याचे महापालिकेकडून शहानिशा केल्यानंतर जाहिर करण्यात येत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूने आपले स्वरूप बदलले आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार अनेकांना या आजारातून मुक्त होण्यासाठी जास्तीचा अवधी लागत आहे. त्यातच नव्या विषाणूचा मारा हा फुफुसावर अधिक प्रमाणात होत असून, यामुळे अनेकांना श्वसन विकार होत असल्याने त्यांना आॅक्सिजनची गरज बराच काळ लागत आहेत. तसेच अन्य व्याधी असलेल्या कोरोनाबाधितांना अशा परिस्थितीत रूग्णालयांत दाखल करून घ्यावेच लागते. यामुळे रूग्णालयांमधील संख्या, शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी कमी होताना दिसत नाही, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वावरे यांनी दिली.
-----------------------------------------