पुणे : शहरात सोमवारी दिवसभरात ४ हजार ४६ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यातुलनेत रूग्णवाढही निम्म्याच्या आसपास आहे. आज दिवसभरात १२ हजार २७६ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ हजार ५७९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २१ टक्के आहे.
आज दिवसभरात शहरात ७९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६२ टक्के आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ७२१ कोरोनाबाधित रूग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ४११ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २१ लाख ७५ हजार ३५० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ३० हजार २१० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख ८२ हजार ५१८ कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही ४० हजार ७०१ इतकी आहे़ शहरात आजपर्यंत ६ हजार ९९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
-----------