पुणे : पुणेकरांसाठी शनिवारचा दिवस दिलासादायक ठरला. ३० मार्चनंतरची सर्वाधिक घट शनिवारी नोंदविली गेली. यासोबतच सक्रिय रूग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी कमी झाली असून बरे होणाऱ्यांची संख्याही पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा अधिक आहे. दिवसभरात ३ हजार ९९१ रुग्ण नोंदविले गेले. ३० मार्चनंतर पहिल्यांदाच हा आकडा चार हजारांच्या खाली गेला आहे. दिवसभरात ४ हजार ७८९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, सक्रिय रूग्णांची संख्या ४९ हजार ४७२ वर आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १३६४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार ५८१ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ४४३ झाली आहे. पुण्याबाहेरील १९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दिवसभरात एकूण ३ हजार ९९१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ लाख ३९ हजार ५७१ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ३ लाख ९५ हजार ४८६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४९ हजार ४७२ झाली आहे. ------------- चाचण्यांचा आकडा पोहचला २० लाखांच्या पारदिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २२ हजार २२७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २० लाख १३ हजार ७०३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
- दिवसभरात 0.14 % ( ४,४६५ ) पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.- दिवसभरात ५,६३४ रुग्णांना डिस्चार्ज.- पुण्यात करोनाबाधित 0.002 %( 68 ) रुग्णांचा मृत्यू. - 0.04 %( १,३२८ ) क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 12.62 % ( ३,९१४९५.) - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1.62% ( ५०,३२५.) - एकूण मृत्यू -0.20% ( ६,३८८.) -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३,३४७८२.- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 0.74% ( २२,९६२.)
....