पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये शनिवार पासून सकाळी सहा ते संध्याकाळी सहा जमावबंदी तर संध्याकाळी सहा 6 ते सकाळी सहा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्बंधांनुसार शहरात नेमके काय सुरू राहणार आणि काय बंद होणारे पाहूयात.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे पीएमपीएमएल च्या बसेस बंद केल्या जाणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व लोकांना या बसमधून प्रवास करायला बंदी असणार आहे.
शहरातील रेस्टोरेंट हॉटेल्स बार पब हे डाईन इन साठी पूर्णपणे बंद केले जाणार आहेत. म्हणजेच या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्हाला खाता येणार नाही. पार्सल ची सेवा मात्र सुरू राहणार आहे. यामध्ये सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळात तुम्ही स्वतः जाऊन पार्सल घेऊ शकता तर सहा वाजल्यानंतर तुम्हाला ॲपच्या माध्यमातून डिलिव्हरी मागवावी लागेल. रात्री अकरापर्यंत फूड डिलिव्हरी सुरू राहणार आहे.
नाट्यगृह स्विमिंग पूल स्पा व्यायामशाळा क्रीडा संकुले क्लब पूर्णपणे बंद राहणार.
सार्वजनिक वाहतूक जरी बंद असली तरीदेखील रिक्षाने प्रवास करायला परवानगी असणार आहे. अर्थात यामध्ये डिस्टन्सींग चे नियम मात्र पाळावे लागतील.
सहानंतर फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी. इतर दुकाने बंद राहणार.
वृत्तपत्र सेवा, दूध भाजीपाला फळे विक्रेते पुरवठादार सेच अत्यावश्यक सेवा पुरवणार्या आस्थापना, आणि कोरोना लसीकरणासाठी जाणारे नागरिक यांना निर्बंध मधून सूट.
शिफ्ट मध्ये काम करणाऱ्या उद्योगांना देखील कर्मचाऱ्यांची ने आण करता येणार.
महापालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे सात दिवसांसाठी बंद.
मंडई सुरू राहणार असली तरीदेखील आठवडी बाजारांना बंदी घालण्यात आली आहे.
शहरातील मॉल पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लग्न पन्नास लोकांच्या उपस्थितीत करता येईल.
अंत्यसंस्कारांसाठी वीस लोकांच्या उपस्थितीचे बंधन.
सर्व प्रकारच्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी.
एसटी बसने प्रवासाला परवानगी.
खाजगी कार्यालयात 50% उपस्थितीचे बंधन. इतर लोकांना वर्क फ्रॉम होम.
30 एप्रिल पर्यंत शाळा कॉलेजेस बंद राहणार.
दहावी-बारावीच्या परीक्षा मात्र नियोजित वेळापत्रकानुसारच.
एमपीएससी परीक्षेसाठी सुद्धा सूट. एमपीएससी कोचिंग क्लासेस ना क्षमतेच्या 50% उपस्थितीला परवानगी.
खाजगी कार्यालयातील लोकांना आयकार्ड दाखवून प्रवास करायला परवानगी. मात्र ठिकठिकाणी पोलिसांचे बॅरिकेडींग आणि चेक पोस्ट उभे केले जाणार.
खाजगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे बंधनकारक.
एका आठवड्यासाठी सिनेमागृह पूर्णपणे बंद राहणार आहेत.
दिवसा पाच पेक्षा कमी लोक एकत्र येऊ शकतात तर रात्री बाहेर पडायला पूर्णपणे बंदी असणार आहे.