पुणे : गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असून, हाॅटस्पाॅट गावांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात हाॅटस्पाॅट गावांची संख्या १४४ एवढी होती. परंतु कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ही संख्या वेगाने वाढत असून, हॉटस्पॉट गावांची संख्या दुपटीने वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना हॉटस्पॉट गावांची संख्या तब्बल 308 झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत दोन प्रकारची गावे दिसत आहेत. हाॅटस्पाॅट गावांची संख्या वाढ असताना तब्बल 444 गावांमध्ये आजही एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. जिल्ह्यात आज 308 गावे कोरोना हॉटस्पॉट बनली आहे. त्यामध्ये शिरूर, जुन्नर, हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यात सर्वाधित हॉस्पॉट गावे आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 20 सप्टेंबर 2020 मध्ये सर्वाधिक 144 हॉटस्पॉट गावांची नोंद झाली. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्गाचा वेग मंदावला. त्यामुळे अनेक नियम शिथिल झाली. मात्र, फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोनाने पुन्हा डोक वर काढले आणि अवघ्या महिन्याभरात 10 मार्च रोजी ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्या 41 वर पोहचली. मार्चअखेर ही संख्या 131 इतकी होती. तर 14 एप्रिल रोजी यामध्ये दुप्पट वाढ होवून 308 वर पोहचली आहे. सुरुवातीला हवेली, शिरूर, इंदापूर, बारामती आणि खेड या तालुक्यांमध्ये बाधित सापडण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, वेल्हा तालुका सोडला तर अन्य सर्व तालुक्यांमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, मार्च अखेरनंतर वेल्हे तालुक्यातही बाधित सापडू लागल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. -----तालुका कंटेन्मेंट झोन संख्या 20 सप्टेंबर 2020 14 एप्रिल 2021
आंबेगाव - 23 28 बारामती - 10 28 भोर - 0 4 दौंड - 5 30 हवेली - 11 30 इंदापूर - 17 30 जुन्नर - 26 35 खेड 10 25 मावळ - 11 9 मुळशी - 1 18 पुरंदर - 6 29 शिरूर - 21 40 वेल्हा - 3 2