शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

coronavirus : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ झाले रिकामे ; 60 टक्के विद्यार्थी गेले गावाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 2:16 PM

काेराेनाचा प्रभाव पुण्यात वाढल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आपआपल्या घरी परतले आहेत.

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये काेराेनाचा प्रभाव वाढत असल्याने त्याचे परिणाम आता विद्यार्थ्यांवर हाेताना दिसत आहे. पुण्यात सध्या काेराेनाचे 10 रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यामध्ये ही संख्या 15 वर जाऊन पाेहचली आहे. अशातच आता महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लेक्चर सुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत. काेराेनाच्या भितीमुळे पालक आपल्या मुलांना गावाला परत बाेलवत असल्याने विद्यापीठातील 60 टक्के विद्यार्थी आपल्या गावी गेल्याचे चित्र आहे. 

दुबईवरुन पुण्यात आलेल्या दांपत्याला काेराेनाची सर्वप्रथम लागण झाल्यानंतर आता हळूहळू राज्यातील अनेक काेराेनाबाधित रुग्ण समाेर येत आहेत. देशात सर्वाधिक काेराेनाबाधित रुग्णांची संख्या राज्यात आहे. राज्यात 31 जणांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यातील विविध ठिकाणांचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यांची संख्या अधिक आहे. हे विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहात किंवा शहरात इतरत्र रुम घेऊन राहतात. सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव पुणे शहरात अधिक असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यापीठाने लेक्चेर्स बंद ठेवल्याने आता विद्यार्थ्यांचे पालक त्यांना घरी येण्याची विनंती करत आहेत. 

विद्यापीठाच्या वसतीगृहात राहणारा सतीश पवार म्हणाला, पुण्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. पालक विद्यार्थ्यांना घरी बाेलवत आहेत. सध्या विद्यापीठाने लेक्चर तसेच ग्रंथालय, वाचनालय बंद ठेवल्याने विद्यार्थी आपल्या गावाकडे परतले आहेत. साधारण 60 टक्के विद्यार्थी आपआपल्या घरी गेले आहेत, त्यामुळे सध्या विद्यापीठात शुकशुकाट आहे. 

जयकर ग्रंथालय बंद विद्यापीठामधील सर्वात माेठे ग्रंथालय असणारे जयकर ग्रंथालय काेराेनाच्या प्रभावामुळे बंद ठेवण्यात आले आहे. कधीही बंद नसणारे हे ग्रंथालय काेराेनामुळए बंद करावे लागले आहे. सध्या विद्यार्थी आपआपल्या रुममध्ये अभ्यास करत आहेत. दरम्यान लेक्सर्स नसले तरी विद्यार्थ्यांनी शहर परिसरात फारसे फिरु नये असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठाच्या परिसरात फिरताना ओळखपत्र जवळ बाळगण्यास सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थी