शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

कोरोनाबाधिताचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 4:57 AM

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना करावे लागले अत्यंसंस्कार

नीलेश राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोरोनाचा संसर्ग पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असतानाच, यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. हे भयावह चित्र असतानाच आणखी एक हृदय हेलवणारी घटना घडली आहे. कोरोनाची लागण झालेल्या पण आधीच इतर आजारांनीे त्रस्त असलेल्या रूग्णाचा मृत्यू नुकताच झाला. पण केवळ कोरोनाबाधित म्हणून हा रूग्ण गणला गेल्याने त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांनीही ताब्यात घेण्यास नकार दिला. परिणामी महापालिकेच्या यंत्रणेलाच सर्व सोपस्कार पार पाडून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

येरवडा येथील एका रूग्णाचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. सदर महिला कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने एकच गोंधळ उडाला होता. सर्व प्रशासकीय यंत्रणाही या भागातील सर्वेक्षणाच्या कामात अधिक मनुष्यबळासह एकवटली गेली. खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरोग्य तपासणीही करत आहे. हे सुरू असतानाच मृत महिलेचा मृतदेह घेण्यास इतर नातेवाईक पुढे आले नाहीत. तीन दिवस पालिकेतील अधिकाºयांनी संपर्क साधला व मृतदेह ताब्यात घेण्याबाबत सांगितले, मात्र त्यांनी नकारच दिला.

संबधित कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या नातेवाइकांकडून पालिकेच्या अधिकाºयांनी लेखी मागणी केल्याने या मृतदेहावर आमचा काहीही अधिकार नाही असे त्यांनी लिहून दिले. यानंतर तीन दिवसांनी या मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करून, तो मृतदेह पालिकेच्या संबंधित यंत्रणेकडे अंत्यसंस्कारासाठी दिला गेलाÞ तेव्हा पालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाºयांनीच मृतदेह स्मशानभूमीत नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले.केंद्राच्या निर्देशानुसार होत आहेत अत्यंसंस्कारकोरोनाबाधितांपैकी आठ जणांचा आजपर्यंत पुण्यात मृत्यू झाला असून, या सर्वांवर केंद्र शासनाच्या सूचनानुसार अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह हा प्लास्टिक च्या विशेष आच्छादनाने आच्छादित करून बंधिस्त केला जातो. हे रोग प्रतिबंधक प्लास्टिक कोट घातलेल्या बॉडीचा फक्त चेहरा दिसावा म्हणून चेहºयाजवळ झिप लावण्यात येते व केवळ त्या मृतदेहाचा चेहरा दाखविण्यापूरताच तो चेहºयाभोवती उघडला जातो. हे कामही पालिकेकडून नियुक्त केलेल्या व रोग प्रतिबंधक ड्रेस परिधान केलेल्या सेवकाकडूनच केले जाते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस