पुणे - शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले असले तरी शेकडो जण विनाकारण घराबाहेर पडताना दिसून येतात. अशा लोकांवर पोलिसांनी भररस्त्यावर व्यायाम करवून घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी श्वानाला घेऊन फेरफटका मारणाऱ्यांची संख्या कमी नाही़. अशा श्वान प्रेमींना पोलिसांनी आता धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. लष्कर पोलिसांनी अशा ७ जणांवर संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी वाजीद नासीर शेख (वय ३१), अमन अमजद शेख (वय १९), सिद्धार्थ मनोज रायजादा (वय २९), अलिम अल्ताफ पटेल (वय ३०,सर्व रा. लष्कर), मोहम्मद तलाह जमादार (वय ३४), हेमंत राजेश चव्हाण (वय २२, दोघे रा. भवानी पेठ), अजीम अकबर शेख (वय ३२,रा.नाना पेठ) यांच्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांना लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.न्यायालयाने सातजणांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
संचारबंदीच्या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहरात पुढील आठ दिवस अधिक कडकपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे़ त्यामुळे विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर रविवारपासून अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : Apple Maps देणार आता कोरोना व्हायरस चाचणी केंद्राची माहिती
Coronavirus : भयंकर! 'तो' वाद जीवावर बेतला, सॅनिटायझेशन करणाऱ्या तरुणाची हत्या
Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत, रुग्णांचा आकडा 7,38,792 वर
Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी टॅक्सी ड्रायव्हर ठरला देवदूत
Coronavirus : धोका वाढला! देशात एका दिवसात 2154 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 16,000 वर
Coronavirus : बापरे! भाजीवाल्याला कोरोनाची लागण, तब्बल 2,000 जण क्वारंटाईन