अमोल अवचिते / नितीन मोहिते- पुणे : कोरोना व्हायरसमुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणांकडून दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पुणेविमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. पुणे विमातळावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येत आहे. विमान पोहोचण्यापूर्वी प्रवाशांना एक फॉर्म भरण्यास सांगितला जातो. प्रवाशाचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक अशी माहिती भरून घेण्यात येते.तसेच या फॉर्ममध्ये सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास अशी काही लक्षणे आहेत का? याची माहिती भरण्यास सांगितली जाते. त्यानुसार प्रवासी माहिती भरून फॉर्म बाहेर पडणाऱ्या गेटमधून जाताना डॉक्टरांकडे जमा करतो. इन्फ्रारेड थर्मामीटरने व्यक्तीचे तापमान मोजले जाते. जे तापमान मोजले जाईल, त्याची नोंद फॉर्मवर केली जाते. ...........
आतापर्यंत १,४१४ प्रवाशांची तपासणी केलीपुणे विमानतळावर परदेशातून एका आठवड्यात १० फ्लाइट येतात. दुबईवरून येणारी रोज एकतरी फ्लाइट असते. पहाटे साडेचार आणि रात्री दीड वाजता अशा दोन फ्लाइट आहेत. कोरोना नवीन व्हायरस असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. प्रवाशांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. प्रवाशांसाठी तत्पर सेवा देण्यात आली आहे. औंध रुग्णालय, येरवडा मेन्टल रुग्णालय, ससून रुग्णालय या तीन रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सेवेसाठी आहे. आतापर्यंत १४१४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे, असे डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले. ......................कोरोनाबद्दल पुणे विमानतळावर पूर्ण काळजी घेतली जात आहे. भारत सरकारने केलेल्या सूचनांचे बारकाईने पालन केले जात आहे. विमानतळ विभागाची एक आणि शासनाची एक रुग्णवाहिका अशा दोन रुग्णवाहिका सेवेसाठी ठेवण्यात आल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी केली जात आहे. वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. -कुलदीप सिंग, संचालक, पुणे विमानतळ. ...........दुबईला मुलगा राहत असल्याने नेहमी तिकडे जाणे असते. कोरोनोमुळे गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे दुबईमध्ये बाहेर कुठे फिरलो नाही. काही खरेदी केली नाही. तिथून विमानात बसताना कोणतीही तपासणी केली गेली नाही. पुण्यात मात्र तपासणी केली गेली. योग्य काळजी घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. - रजनी नाडकर्णी, तळेगाव ढमढेरे..........दुबईतील नागरिकांमध्येही भीती असल्याचे दिसून येत आहे. मॉल, हॉटेल मोकळे पडत आहेत. प्रत्येकाला स्वत:च्या जीवाची काळजी आहे. दुबईतील स्थनिक नागरिकांमध्ये असल्यामुळे काही भीती जाणवली नाही. दुबईतून पुण्यात येताना कोणत्याही प्रकारची तपासणी केली गेली नाही. पुण्यात पोहचताच विमानतळावर तपासणी केली जात आहे.- अक्रम अली मदारी, प्रवाशी...............