देशात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित (Corona Positive Patient) सापडू लागले आहेत. यापैकी अनेक रुग्ण हे लक्षणे नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकट्या मुंबईतील 80 टक्के रुग्ण कोरोनाची लक्षणे नसल्याचे आढळले होते. केवळ कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांची टेस्ट केली असताही अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. पुण्यातील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी पॅथोलॉजी लॅबची (Pathology Lab) तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यामुळे आयसीएमआरने (ICMR) कोरोना चाचणीचा देशभरासाठी एकच फॉर्म्युला ठरविला आहे. (ICMR guideline for Private labs who testing Corona Samples. )
जगभरात RTPCR टेस्टचा सायकल थ्रेशोल्डचा (CT) कट ऑफ हा 35 ते 40 च्या रेंजमध्ये असतो. मात्र, ICMR ने देशभरातील विविध लॅबोरेटरीजकडून मागविलेल्या माहितीवरून देशभरासाठी एकच फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. यानुसार आरटीपीसीआर टेस्टचा सीटी व्हॅल्यूचा कट ऑफ 35 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्या रुग्णाला कोरोना पॉझिटिव्ह ठरविण्यात येणार आहे. तर त्यापेक्षा सीटी व्हॅल्यूचा कट ऑफ हा 35 पेक्षा जास्त असेल तर त्याला निगेटिव्ह ठरविण्यात येणार आहे. तसेच ज्या रुग्णांचा कट ऑफ 35 पेक्षा कमी आणि त्यांच्यात कोणतीच लक्षणे दिसत नसतील तर त्यांना कोरोना पॉझिटिव्ह न ठरविता त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने आरटीपीसीआर टेस्टचे रिस्ट्रक्चर करण्याची विनंती केली होती. यामध्ये 24 पेक्षा कमी सीटी व्हॅल्यू असलेल्या रुग्णांनाच कोरोनाबाधित समजण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी आयसीएमआरने फेटाळून लावत महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. यामुळे कोरोनाची बाधा झालेला रुग्ण निगेटिव्ह आल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
क्रस्ना डायग्नोस्टिकच्या पल्लवी जैन म्हणाल्या, “ वेगवेगळ्या लॅब वेगवेगळे कीट वापरतात. त्यातून नेमकं कोणाला पॉझिटिव्ह धरायचं याबाबत गोंधळ निर्माण होत होता. देशभरात हा प्रश्न होता. त्यामुळे आता आयसीएमआरने हे स्टॅडर्डायझेशन केलं आहे. यामुळे आता पॅाझिटिव्ह साठी सिटी व्हॅल्यु तर स्पष्ट झाली आहेच पण रीटेस्टचे ही स्पष्टीकरण दिल्याने आता पॅाझिटिव्ह रुग्ण सापडून त्यांचे आयसोलेशन करायला मदत होईल जेणेकरुन असिम्प्टोमॅटिक लोक सापडून त्यांचे विलगीकरण देखील होवून प्रसार रोखला जावू शकेल”.