वाकड : थेरगावातील भाजपच्या नगरसेविका माया संतोष बारणे यांनी महापालिकेकडून देण्यात येणारे मानधन आणि सर्व भत्त्यांची रक्कम नाकारत ती रक्कम महापालिकेच्या महापौर सहायता निधीला वळती केली आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी नुकतेच आयुक्तांना दिले. महापालिकेच्या वतीने नगरसेवकांना दरमहा ७५०० रुपये मानधन स्वरूपात वेतन व सभा भत्तादेखील दिला जातो. महापालिकेच्या शहरातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या महापौर सहायता निधीद्वारे रुग्णांना उपचारासाठी मदत दिली जाते. माझ्या मानधनाच्या रकमेतून वंचित घटकांना मदत व्हावी आणि संबंधित विभागाला तशा सूचना द्याव्यात असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. (वार्ताहर)
नगरसेविका माया बारणे यांनी नाकारले मानधन
By admin | Published: March 31, 2017 2:54 AM