शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

नगरसेवकांची आज झाडाझडती?

By admin | Published: October 02, 2015 1:12 AM

सरकार नियुक्त समितीने केलेल्या शहर विकास आराखड्यावर पक्षाच्या नगरसेवकांनी घेतलेली बोटचेपी भूमिका व हिराबाग; तसेच

पुणे : सरकार नियुक्त समितीने केलेल्या शहर विकास आराखड्यावर पक्षाच्या नगरसेवकांनी घेतलेली बोटचेपी भूमिका व हिराबाग; तसेच श्रावणधारा भूखंडाबाबत झालेले कामकाज, यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असून, या संदर्भात त्यांनी सर्व नगरसेवकांची शुक्रवारी दुपारी गोखलेनगर येथील बारामती होस्टेलवर बैठक बोलाविली आहे. यात नगरसेवकांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासह स्थायी समिती सभापती अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे हे पदाधिकारी व सर्व नगरसेवकांना या बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. पक्षाच्या पालिकेतील कामकाजाची माहिती घेण्यासाठी बैठक बोलाविली. मात्र, काही विषयांवरून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत पवार नाराज असून, त्यासाठीच त्यांनी ही बैठक बोलाविली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचबरोबर काही पदांच्या खांदेपालटाबाबतही शक्यता अजमावून पाहणार असल्याचे समजते. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता आहे. महापालिकेने तयार केलेल्या पुणे शहर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर तो मुदतीत पूर्ण केला नाही म्हणून भाजपाप्रणीत राज्य सरकारने काढून घेतला. त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीने हा आराखडा पूर्ण करून, नुकताच तो सरकारला सादर केला. त्यावर महापालिकेच्या बुधवारी (दि.३०) झालेल्या सर्वसाधारण सभेत बराच गदारोळ झाला. त्यात काँग्रेसने अतिशय आक्रमक भूमिका घेतली. तुलनेत सत्ताधारी असूनही राष्ट्रवादीचे नगरसेवक मात्र शांत होते. पक्षाच्या महापालिकेतील कामकाजाबाबत पवार बरेच संवेदनशील आहेत. त्याआधीच त्यांनी महापौरांकडे खासगीत शहर विकास आराखडा व झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी विचारणा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतरच सर्व नगरसेवकांना बैठकीचे सांगण्यात आले. उद्या दुपारी बारामती होस्टेलवर ही बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)