पुणे : कॉसमॉस बँकेचे एटीएम स्विच (सर्व्हर) हॅक करून हॅकरनी टाकलेल्या आॅनलाईन दरोड्याच्या वेळी कॉसमॉस बँकेच्याच काही ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यांपैकी काही जणांनी हॅकिंग सुरू असतानाच पैसे काढले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दोन जण आढळले़ त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम परत मिळविली.कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम सर्व्हर हॅक करून हॅकरनी मोठी रक्कम लुटली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी तत्काळ विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. त्यानंतर पथकाने तत्काळ पुणे, कोल्हापूर, मुंबई व इंदूर या शहरांमधील ज्या एटीएममधून पैसे काढले गेले आहेत, त्यावर लक्ष ठेवले. पोलिसांनी र्बंकेच्या काही ग्राहकांच्या खात्याची तपासणी केली, त्या वेळी काही जणांनी सातत्याने एटीएममधून पैसे काढल्याचे आढळले. एसआयटी पथकातील व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलीस निरीक्षक राधिका फडके यांना तपासादरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. पोलिसांनी काही बँकांच्या ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या खात्यामध्ये जादा पैसे जमा झाल्याबाबत विचारणा केली. त्या वेळी पुण्यातील दोघांनी आपल्या खात्यामध्ये अचानक जादा पैसे जमा झाल्याचे सांगितले. हॅकिंग वेळी बँकेचे ग्राहक असलेल्यांच्या पुण्यातील एकाच्या खात्यामध्ये ९० हजार, तर दुसऱ्याच्या खात्यातून २० हजार होते. दोघांकडूनही हे पैसे परत मिळविले.शंभर जणांच्या खात्यात जादा पैसे जमा झाल्याचा संशयकॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक केल्यानंतर भारतातील काही खातेदारांच्या खात्यात जादा पैसे जमा झाले. पोलिसांकडून तपास सुरू असताना पुण्यातील दोघांच्या खात्यात जादा पैसे जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील शंभर खातेदारांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जाणार असल्याची शक्यता आहे.
कॉसमॉस बँक सायबर हल्ला: दोन खातेदारांकडून १ लाख वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 4:29 AM