शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

‘कॉसमॉस’ सायबर दरोडा: दहा देशांतून रकमेची सर्वाधिक लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 2:53 AM

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्या प्रकरणी १८ पैकी सर्वाधिक व्यवहार झालेले दहा देश निष्पन्न झाले आहे

पुणे : कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्या प्रकरणी १८ पैकी सर्वाधिक व्यवहार झालेले दहा देश निष्पन्न झाले आहे. या देशातून लुटलेली रक्कमेचा शोध लागावा यासाठी इंटरपोल आणि इतर प्रक्रियेद्वारे या देशांशी संपर्क साधण्यात येत आहे. जवळपास ७८ कोटी रुपयांची रक्कम या देशांतून लुटल्या गेल्याने येथे अधिक लक्ष देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्राच्या सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनी बुधवारी दिली.कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यात तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटून नेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सिंग आणि पोलीस उपायुक्त (सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखा) ज्योतीप्रिया सिंग यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. तब्बल पाच तास झालेल्या या बैठकीत हा दरोडा कसा झाला यावर चर्चा करण्यात आली. काही खासगी सायबर तज्ज्ञांची देखील यासाठी मदत घेण्यात आली. या बैठकीनंतर सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सिंग म्हणाले, पुणे, कोल्हापूरसह देशातून २ ते सव्वा दोन कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. परदेशातून ७८ कोटी आणि स्विफ्ट प्रणालीद्वारे १३ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे परदेशातील व्यवहारांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. याचा शोध घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक अशा तिनही पातळीवंर काम सुरु आहे.पुणे सायबरच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग म्हणाल्या, देशांतर्गत २ हजार ९८० व्यवहार झाले आहेत. देशातून काढण्यात आलेली दोन ते सव्वा दोन कोटी रुपयांची रक्कम दहा हजार ते १ लाखापर्यंतच्या व्यवहाराद्वारे काढली. बँकेच्या यंत्रणेवर हल्ला झाल्यानंतर, काही खात्यांमध्ये अधिक रक्कम जमा झाल्याचे दिसत होते. तसेच अतिरिक्त जमा दिसत असलेली रक्कम काढताही येत होती. एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. त्यानुसार खात्यात जमा झालेली अतिरिक्त रक्कम काढणाºयांचा शोध घेण्यात येईल. परदेशातून २८ पैकी सर्वाधिक रक्कम काढल्या गेलेल्या दहा देशांची नावे निष्पन्न झाली आहेत. या पुर्वी चेन्नईतील एका बँकेवर अशा प्रकारचा सायबर हल्ला झाला होता. त्यात ३४ कोटी रुपयांची रक्कम लुटून नेली होती. तसाच हल्ला कॉसमॉस बँकेवर झाला आहे. मात्र, त्याची व्याप्ती अधिक आहे. बँकेच्या कार्डधारकांचा डाटा चोरुन डार्क नेटच्या माध्यमातून त्याची विक्री करण्यात आली. संबंधित डाटा खरेदी केलेल्यांना पैसे काढण्याची वेळ देखील दिली होती. त्यानंतर संबंधितांनी क्लोन कार्डच्या माध्यमातून हे पैसे काढल्याचे दिसून येत आहे.या हल्ल्याच्या कालावधीत अनेक खातेदारांच्या खात्यात अधिक रक्कम जमा झाल्याचे दिसत होते. मात्र, प्रत्यक्ष रक्कम जमा झाली नव्हती. सिस्टीमवर झालेल्या हल्ल्यामुळे ही रक्कम मात्र, त्या वेळेत काढता येत होती. प्रथमच अशा प्रकारचा हल्ला असल्याने हा विस्तृत तपासाचा भाग असल्याची माहिती सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनी दिली.पुणे कोल्हापूरसह विविध ठिकाणांहून पैसे काढण्यात आले आहे. त्यासाठी विशेष तपास यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र, पैसे काढणाºयांचा शोध घेण्यासाठी जिल्हास्तरावर देखील विशेष पथक नेमण्याचा निर्णय घेतला.रुपे, व्हिसा कंपनीची तपासकामी मदत घेणारहॉंगकॉंग देशातील हेनसेंग बँकेच्या खात्यामध्ये स्विफ्ट व्यवहारांद्वारे आॅनलाइन रक्कम जमा झाली आहे. त्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेशी संपर्क साधण्यात येत असून, त्या पैशाची वसुली करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. व्हिसा, रूपे कंपनीसोबत सर्व तपास यंत्रणांना सोबत घेऊन योग्य दिशेने तपास सुरू असल्याचे विशेष महानिरीक्षक ब्रजेश सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbankबँकfraudधोकेबाजी