सुनील राऊत, पुणेनागरिकांनी शहर विकासासाठी भरलेल्या कराच्या रकमेतून शहरभर उभारण्यात आलेल्या स्टेनलेस स्टिलच्या बसथांब्यांवरील जाहिरातींचे उत्पन्न थेट लोकप्रतिनिधींच्या खिशात जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल पीएमपी प्रशासनाने घेतली असून, अशा थांब्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.पीएमपी आणि पीसीएमटीच्या विलीनीकरणानंतर पीएमपीएमएलचा कारभार सुरू झाला. मात्र, निधीअभावी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बसथांब्यांची दुरवस्था झालेली होती. त्यामुळे टिकाऊ बसथांब्याच्या नावाखाली स्टेनलेस स्टिलचे प्रत्येकी ३ लाख रुपयांचा एक असे बसथांबे उभारण्याची नवीन टूमच शहरात सुरू झाली. आधीच शहरात निधी खर्ची पाडण्यास अडचणी येत असलेल्या आमदार तसेच खासदारांना खर्चाचे एक नवीन साधन या थांंब्यांमुळे उपलब्ध झाले.
खर्च नागरिकांचा; उत्पन्न लुटताहेत लोकप्रतिनिधी
By admin | Published: May 13, 2015 3:07 AM