नगरसेवकांना कानपिचक्या - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:28 AM2018-02-03T02:28:23+5:302018-02-03T02:29:28+5:30
शहरातील मंडईतील मूळ जागामालकांनाच गाळे दिले पाहिजेत, शहरातील गणेश मंडईच्या जागा वाटपातही गडबड करण्याचा प्रयत्न झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. हे खोटे असेल तर दुधात साखर, अन्यथा मी ते नीट करणार. मला ते चालणार नाही.
बारामती - शहरातील मंडईतील मूळ जागामालकांनाच गाळे दिले पाहिजेत, शहरातील गणेश मंडईच्या जागा वाटपातही गडबड करण्याचा प्रयत्न झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. हे खोटे असेल तर दुधात साखर, अन्यथा मी ते नीट करणार. मला ते चालणार नाही. आपण बारामतीमध्ये टिकलो ते केवळ आपण दिलेला शब्द पाळतो म्हणूनच. शब्दाचे पक्के असल्याने आज आपण या स्थानावर आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या. चुकीचे वागाल तर राजीनामा घेण्याचा सज्जड दमदेखील पवार यांनी या वेळी दिला.
बारामती येथे जाहीर सत्कार व पक्षाच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी पवार यांनी नगरसेवकांना चांगलेच सुनावले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी गेल्या काही महिन्यांपासून सतत रजेवर जात आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी या वेळी नगरसेवकांना दिलेल्या कानपिचक्यांची चांगलीच चर्चा रंगली. पवार म्हणाले, काही अधिकारी, कर्मचारी फोन करून मला सांगतात, मला रजेवर जावे लागतंय. आम्हाला काम करूदिले देत नाही. आम्हाला योग्य वागणूक दिली जात नाही, हे चांगले नाही. आपण कडक वागतो. मात्र, काम करून घेण्याची हातोटी असते. तुम्ही समजुतीने काम करून घ्यायला शिका.
अधिकाºयांशी अडेलतट्टूपणाने वागाल, ते मी खपवून घेणार नाही. अलीकडे घरगडी कोणाचे ऐकत नाही. मग तुम्ही त्यांच्याशी घरगड्याप्रमाणे वागाल तर कसे चालेल, नगरपालिकेच्या सर्वांनी याची नोंद घ्यावी. सर्वांना समजून सांगण्याची आपली भूमिका आहे.
पुरुष नगरसेवकांनी महिला नगरसेवकांशी नीट बोलावे, आदराने बोलावे. काही जण वेगळ्या पद्धतीने गटबाजी करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने वागतात, असे काही महिला नगरसेवक फोन करून सांगतात. गटबाजी करण्याचा, स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या भानगडीत पडू नका, मी हे सहन करणार नाही. सगळे राष्ट्रवादीचेच आहेत. गटबाजी चालणार नाही, हे नम्रतेने नमूद करू इच्छितो. गणेश मंडईतील गाळे चुकीच्या व्यक्तींना दिले असल्यास चालून घेणार नाही, असेही त्यांनी सुनावले.
दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका...
नगरसेवकांना मला भेटायचे असेल तर निवेदनावर सह्या करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. माझ्यावर दबाव आणण्यासाठी सह्या करणारांना अजित पवार राजकारणात असेपर्यंत एकही पद मिळणार नाही. कोणतीही दादागिरी सहन केली जाणार नाही.
उपनगराध्यक्ष पद मिळविण्यासाठी नगरसेवकांनी सह्यांची मोहीम राबविली आहे. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, दबाव आणणाºया नगरसेवकांचे राजीनामे घेऊ, नवे नगरसेवक निवडून आणू, हे लक्षात ठेवा, असे पवार यांनी नगरसेवकांना ठणकावले.