पुणे - वाद टोकाला गेला की जोडप्यात पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अनेक प्रकरणांत ही जोडपी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. असे प्र्रकार कमी व्हावेत आणि दावा दाखल करण्यापूर्वीच त्यांना समुपदेश व्हावे म्हणून कौटुंबिक न्यायालयात चला बोलू या हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणकडून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुंबईत बांद्रा कौटुंबिक न्यायालयात प्रथम अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर पुण्यात सुरू करण्यात आलेले हे दुसरे केंद्र आहे.कौटुंबिक स्वरूपाच्या दाव्यांत तक्रारदारांना दाखलपूर्व मार्गदर्शन मिळावे हा या केंद्राचा उद्देश आहे. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. ओक यांच्या हस्ते या केंद्राचे नुुकतेच उद्घाटन करण्यात आले. केंद्रात तक्रारदारांना समुपदेशकांबरोबर बोलता यावे म्हणून स्वतंत्र रुम करण्यात आली आहे. समुपदेशनासाठी आलेल्या लोकांसाठी वेटींग रूम तयार करण्यात आली आहे, अशी माहिती दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.
दावा नको, चला बोलू या, दाम्पत्यांचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:27 AM