दिवसेंदिवस खेड तालुक्यातील गावाचा विस्तार होत आहे. त्याचप्रमाणे भांडण-तंटा, घरगुती वादविवाद, महिलांच्या आडीअडचणी यांचे समोरासमोर कुटुंबातील नागरिक यांना बोलवून त्यांचे समुपदेश करण्यात येते. तसेच नवरा-बायकोची भांडणे हे प्रमाण सुद्धा वाढले आहे. महिला व मुलींना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. विशेषत: कामाच्या ठिकाणी काही व्यक्ती त्यांच्या पदाचा व स्त्रीच्या असहाय्यतेचा फायदा घेत स्त्रियांचे शोषण करत असल्याच्या अनेक घटना घडतात. यासाठी महिलांना न्याय मिळावा यासाठी दक्षता कमिटी खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली. कोरोनाच्या काळातही दक्षता समितीने चांगले काम केले आहे. या समितीमध्ये महिला सहाय्यक निरीक्षक वर्षा राणी घाटे, महिला पोलीस हवालदार मंगल पंचरास, सारिका बोरकर, दक्षता कमिटीच्या अध्यक्षा ॲड. मनीषा टाकळकर, रेखा क्षौत्रिय, यांच्यासह राजगुरुनगर शहरातील व ग्रामिण भागातील वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्या अशा माहिलांचा समावेश करण्यात आला आहे.
कोट
दक्षता निवारण समिती पीडित महिलेच्या पाठीशी त्यांचे सहकारी राहत नाही. अशा वेळी एकटे पडण्याचा धोका असल्याने महिला फारशा पुढे येत नाही. या पार्श्वभूमीवर, महिला तक्रार निवारण ,सुरक्षा यावर दक्षता समितीद्वारे संघर्षगस्त महिलांना कायदेविषयक सहाय्यता मिळवून देण्याकरिता पोलीसांच्या मध्यस्थीने पूर्ण सहकार्य करण्यात येते..
अॅड.. मनीषा टाकळकर महिला दक्षता निवारण समिती अध्यक्षा