बारामती : साखरेच्या तुलनेत घाऊक बाजारात गुळाला चांगला दर मिळत आहे. सध्या गुळाला ३८२५ ते ३९०० प्रतिक्विंटल दर मिळत ्रआहे. किरकोळ बाजारात गुळाचा दर भाव खाऊन गेला आहे. व्यापारीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. मात्र या वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. प्रतवारी प्रमाणे गुळाला दर मिळत आहे. सध्या सणांचा हंगाम नसला तरी स्थानिक बाजारात गुळाला चांगला मिळत आहे, हे विशेष. दुष्काळी परिस्थितीत असल्याने अनेक गावात जत्रा-यात्रा साजरी झाल्या नाहीत. यावेळी घरोघरी पुरणपोळ्या केल्या जात. गुळ, डाळींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पाण्याअभावी अनेक पिके जळून गेली. परिणामी भुसार मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. यंदा उसाचा वापर शेतकऱ्यांनी जगावरांच्या चाऱ्यासाठी केला आहे. गाळपचा उस चाऱ्याला वापरल्याने साखर, गुळ यांच्या उत्पादनात घट झाली. साखर, गुळाचे कारखाने यावर्षी लवकर बंद झाले. यामुळे आर्थिक नुक सान अधिक झाले आहे. कमी पाण्यामुळे उसाचे वजन घटू नये, यासाठी गुऱ्हाळांना उस देण्याकडे कल वाढला होता. गतवर्षी पाऊस कमी झाला. शेतीच्या उत्पादनावर परिणाम झाला. परिणामी बाजार पेठ मंदाली आहे. आता या वर्षीच्या पावसाकडे व्यापाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. पाऊस सांगा झाला तर बाजार पेठ फुलनार आहे. शेतकऱ्यांनी शेतात पिके घेण्यास सुरूवात झाली आहे. उत्पादन चांगले निघाले तर बळी राजा आनंदी होइल. पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी शेतात अनेक पिके घेण्यास सुरूवात केली आहे. यंदाच्या वर्षी उस उत्पादक इतर पिके घण्याच्या तयारीतआहे. असे झाले तरी साखर, गुळाचे भावत अधिक वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)साखर:३५७५-३६०० गूळ १ नं.:३८२५-३९००गूळ २ नं.:३६५०-३७५० गूळ ३ नं.:३४५०-३५५०गूळ ४ नं.:३३२५-३४०० बॉक्स पॅकिं ग:३४००-४२००जादा पॅकिंग गूळ:४०००-४२००
गुळाला प्रतिक्विंटल ३९०० रुपये दर
By admin | Published: June 16, 2016 4:14 AM