संथ मावळ विधानसभेची मतमोजणी अगदीच संथगतीने सुरू होती, त्यामुळे निकाल जाहीर करण्यास उशीर होत होता. उरण विधानसभेच्या निकालाचे कामही काही काळ संथच होते, त्यामुळे एकूण निकाल जाहीर करण्यास उशीर होत होता. काम वेगात करून त्वरित निकालपत्र देण्याची वारंवार ध्वनिक्षेपकावरून सूचना केली जात होती. निकाल जाहीर करण्यास विलंब फेरीनिहाय मोजणी वेगात सुरू होती. १५ मिनिटांपेक्षा कमी काळात एका फेरीचे काम होत होते. मात्र, उमेदवार प्रतिनिधीच्या सह्या, पेटी पुन्हा सील करणे, इतर बाबी पूर्ण करण्यात अधिक वेळ जात होता.दुपारी बारानंतर फेरीनिहाय निकालपत्र देण्यात वेग आला; मात्र तो प्रत्यक्ष फेरीच्या मागेच होता, त्यामुळे माध्यमाच्या प्रतिनिधींना निकालपत्राची वाट पाहत ताटकळत बसावे लागत होते. मतमोजणी कक्षात मोबाईलही अॅथलेटिक्सच्या मुख्य स्टेडियमसमोर मेटल डिटेक्टर उभारले होते.मतमोजणी कक्षात मोबाईल नेण्यास पूर्णपणे बंदी होती. कडक सुरक्षाव्यवस्था भेदून कक्षात उमेदवार प्रतिनिधी व पत्रकारांनीही मोबाईल नेले होते. फेरीनिहाय निकाल प्रतिनिधी संबंधितांना मोबाईलवरून देत होते.
मावळ व उरणमध्ये मतमोजणी
By admin | Published: May 17, 2014 5:54 AM