पिंपरी : निवडणूक कामासाठी नेमणूक केलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्मचार्यांना दुसर्या टप्प्यात मतमोजणी कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले. मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे, सहायक निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी निवडणूक कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले. मतमोजणीच्या २६ फेर्या होतील. फेरीनिहाय निकाल जाहीर केला जाणार आहे. चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.समन्वय अधिकारी प्रशांत खांडकेकर, अजित रेळेकर, दिलीप गावडे, भगवान घाडगे, प्रमोद भोसले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम परदेशी, मकरंद देशमुख, राजेंद्र बोरकर, सुभाष बोरकर, भानुदास गायकवाड, यशवंत माने, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी नलवडे आदी उपस्थित होते. मतमोजणीसाठी नेमलेल्या ७०० कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचार्यांना सकाळी ११ ला कर्जत, उरण व पनवेलमधील कर्मचार्यांना दुपारी ३ ला अशा दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. म्हाळुंगे, बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी केंद्रावर वेळेत हजर राहावे. या प्राथमिक सूचनेसह कामकाजात कोणती दक्षता घ्यावी. याबाबत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
मतमोजणीच्या होणार २६ फेर्या
By admin | Published: May 13, 2014 2:24 AM