पुणे : आंबिल ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या यंत्रणेला गुरुवार दि.२४ जून रोजी कारवाई थांबविण्यासाठी महापालिका न्यायालयाने दिलेली तात्पुरती स्थगिती आज (शुक्रवार, दि.२०) उठवली आहे.
बिल्डरांच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा जात असल्याचा आरोप करीत, स्थानिक नागरिकांनी या कारवाईला २४ जून रोजी मोठा विरोध केला होता़ तर या कारवाई विरोधात स्थानिक रहिवासी हनुमंत फडके हे न्यायालयात गेले होते़ तेव्हा न्यायालयाने या कारवाईला तात्पुरती स्थगिती देत महापालिकेने या कारवाई विषयी आपली भूमिका प्रथम न्यायालयात सादर करावी़ तसेच म्हणणे सादर करेपर्यंत ही कारवाई थांबवण्याची सूचनाही केली होती.
त्यानुसार आज महापालिका न्यायालयाने महापालिका व कारवाई विरोधातील याचिकाकर्त्यांची भूमिका ऐकून ही तात्पुरती स्थगिती काढून घेण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत़ यामुळे आंबिल ओढ्यातील दांडेकर पूल परिसरातील अतिक्रमण कारवाईबाबत आता महापालिका काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.