शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

मुलाचा ताबा देण्याचा न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 5:38 AM

वडिलांचाही सहवास महत्त्वाचा : आईचे अपील फेटाळले

पुणे : मुलांच्या सर्वांगीण विकास व वाढीसाठी आई बरोबरच वडिलांचा सहवासही तितकाच महत्वाचा असल्याचा निर्वाळा देत सत्र न्यायालयाने अपील करणाऱ्या पत्नीला फटकारत सुटीच्या काळात मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचा आदेश दिला आहे. प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश मोहिते यांनी मुलाचा ताबा देण्यासंबंधीचा दिलेला आदेश अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी कायम ठेवला आहे.पती पत्नी हे दोघेही परप्रांतीय असून दोघेही उच्च शिक्षित आहेत. तो आयटी क्षेत्रात नोकरीस आहे. लग्न झाल्यानंतर काही काळ तिने करिअरला प्राधान्य दिले. त्यावरुन दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. याच काळात ती गर्भवती देखील राहिली त्याच्या आग्रहाने तिने एका बाळाला जन्म दिला. बाळंतपणासाठी माहेरी गेली ती पुन्हा सासरी नांदायला आलीच नाही. तिकडेच तिने पुन्हा नोकरी सुरू केली. त्याने तिच्या माहेरी जाऊन मुलाला आणि पत्नीला घरी पाठवून देण्याची विनंती केली. परंतु, त्यालाच तिच्या आई-वडिलांनी धमकी दिली. त्याने प्रत्येक सणाला, मुलाच्या वाढदिवसाला कपडे पाठविले. याच दरम्यान त्याने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्यानंतर तिला पुन्हा मुलाला घेऊन पुण्यात नांदण्यासाठी बोलविले. ती पुण्यात येऊन त्याच्याबरोबर ७ ते ८ महिने राहिली़ या काळात त्याचा मुलाबरोबरचा जिव्हाळा वाढला़ त्यानंतर तिने मुलाला आईकडे पाठविले. तसेच स्वत:ही घर सोडून पुण्यातच भाड्याने राहू लागली. २०१५मध्ये पती विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये तिने न्यायालयात दावा दाखल केला.त्याने अ‍ॅड. प्रगती पाटील यांच्यामार्फत मुलाला आठवड्यातून एकदा तरी भेटण्यासाठी ताबा मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला. प्रथमवर्ग न्यायालयाने त्याच्या बाजूने आदेश देताना दर रविवारी १० ते १२ या वेळेत भेटण्याची मुभा दिली. या आदेशानंतरही तिने मुलाला भेटू देण्यासाठी टाळाटाळ केली. गावाला जाते सांगून ती गेली. त्याने२६ मार्च रोजी सुटीच्या काळात मुलाचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालयाने ११ ते २५ मे दरम्यान मुलाचा ताबा देण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात तिने सत्र न्यायालयात अपील दाखल केले. प्रथमवर्ग न्यायालयातील अर्जावरील सुनावणीला ती जाणून बुजून अनुपस्थित राहिल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेला आदेश योग्य असून वडिलांना मुलाचा ताबा मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच मुलाच्या वडिलांना आता २० मे ते ६ जूनपर्यंत मुलाचा ताबा देण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयFamilyपरिवार