लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : प्रेमसंबंधाला घरचे संमती देणार नाहीत या नैराश्यातून आमोंडी भैरवनाथवाडी (ता. आंबेगाव) येथील चुलत बहीण-भाऊ संदीप तुकाराम काळे (वय २१) व मनीषा अंकुश काळे (वय २२) या दोघंनी विहिरीत जीव देऊन आत्महत्या केली.वाडीतील काही मुले आंबे खाण्यासाठी म्हसोबा मंदिराच्या पाठीमागे गेली व तेथून रामचंद्र बिबवे यांच्या विहिरीवर हात धुण्यासाठी गेली असता त्यांना विहिरीत दोन प्रेते पाण्यावर तरंगत असलेली दिसली. त्यांनी ताबडतोब लोकांना कळविले. विहिरीवर जाऊन पाहिले असता त्यांना संदीप काळे व मनीषा काळे यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. याबाबत अंकुश बबन काळे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही मृतदेह बाहेर काढले. अधिक तपासात या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते, हे दोघे नात्याने चुलत बहीण-भाऊ होते. त्यामुळे घरचे संमती देणार नाहीत. या नैराश्येतून दोघांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचे समजले. तसेच याबाबत आमची काही तक्रार नाही अथवा कोणावरही संशय नाही असे अंकुश काळे यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर यांच्यासह शंकर तळपे, मारुती सरोदे, देवराम धादवड, अमोल काळे, संदीप लांडे, के. एम. गरूड करत आहेत.
चुलत बहीण-भावाची आत्महत्या
By admin | Published: June 27, 2017 7:47 AM