बारामती : बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, तारांगण महिला वसतिगृह, टीसी कॉलेज मुलींचे वसतिगृह, राजमाता अहिल्यादेवी होळकर वसतिगृह, रयत भवन, विद्या प्रतिष्ठान मुलांचे व मुलींचे वसतिगृह या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकरिता कोविड केअर सेंटर चालविले जात आहे.
या कोविड केअर सेंटरच्या स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. या कोविड केअर सेंटरच्या स्वच्छतेसाठी उद्योजक रवींद्र आबा काळे यांनी २ लाखांच्या वस्तू नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण दादा गुजर यांच्याकडे सुपूर्त केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने तेथील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती साफसफाई रहावी याकरिता आवश्यक डस्टबिन बॉक्स, बादल्या, मग, सॅनिटायझर, फिनेल, कोविड केअर सेंटर रोज निजंर्तुकीकरण करण्याकरता लागणारे मोठे स्प्रे पंप, खराटा, झाडू अशा विविध आवश्यक वस्तू, सर्व कोविड सेंटरला बेडशीट, पाण्याचे जारसह दोन लाख रुपये किंमतीची उपयोगी वस्तू उद्योजक रवींद्र काळे यांनी नटराज नाट्य कला मंडळाच्या अध्यक्ष किरण दादा गुजर यांच्याकडे सुपूर्त केल्या.
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये संपूर्ण जग अतिशय कठीण प्रसंगातून जात आहे. अशावेळी माणुसकीच्या भावनेतून गेली एक वर्षापासून नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने किरण गुजर व त्यांची संपूर्ण टीम जे कार्य करीत आहे. त्या कार्यामध्ये आपणही सहभागी असावे या जाणिवेतून नेमकी गरज ओळखून काळे यांनी मदत केली आहे.
————————————————
फोटो ओळी : उद्योजक रवींद्र काळे यांनी कोविड केअर सेंटरच्या स्वच्छतेसाठी नटराज नाट्य कला मंडळाच्या अध्यक्ष किरण गुजर यांच्याकडे विविध वस्तु सुपूर्त केल्या.
२६०४२०२१-बारामती-०६
————————————————
बातमी फोटोसह सविस्तर आवश्यक