मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील पुण्याई मंगल कार्यालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर महिलांसाठी व पुण्याई मंगल कार्यालयामध्ये पुरुषांसाठी असे दोन्ही मिळून एकूण १०० बेड सुविधा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. जेे कोरोना बाधित या विलगीकरण कक्षात राहतील व कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात मदत होईल. मंगल कार्यालयाचे मालक संभाजी फराटे यांनी आपले कार्यालय कोविड केअर सेंटरसाठी दिले आहे. शिरूरच्या पूर्व भागातील ग्रामपंचायतीने देखील कोविड केअर सेंटरला मदत करायची आहे, शिरूरच्या पूर्व भागामध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे, कोरोना रुग्णांसाठी जवळच कोविड हेअर सेंटर झाले तर याचा फायदा परिसरातील नागरिकांना होणार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे मंगल कार्यालयामध्ये लग्नाचे बुकिंग केले होते ती सर्व बुकिंग रद्द करून मी कोविड केअर सेंटरसाठी कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. अशा संकटाच्या काळी जर उपयोगाला आले नाहीतर त्याचा काय उपयोग, असे फराटे यांनी सांगितले. यावेळी सरपंच शिवाजी कदम, शंकर फराटे, राजीव काबळे, बाळासो फराटे आदी उपस्थित होते.
--
कोट
नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळावे, बाहेर पडणे गरजेचे असेल तर मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी सहकार्य करा.
सुजाता पवार (जिल्हा परिषदेच्या सदस्या)