तहसीलदार एल. डी. शेख, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले. आमदार अशोक पवार, माजी सभापती सुजाता पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. यासाठी पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महसूल विभाग व राव-लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील चंद्रभागा मंगल कार्यालयात १२० बेडचे सुसज्ज सेंटर साकारण्यात आले आहे.
या वेळी गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, माजी संचालक शिवाजी वडघुले, बाजार समितीचे उपसभापती विकास शिवले, माजी संचालक कांतिलाल होळकर, माजी सरपंच प्रशांत सात्रस, सरपंच सोमनाथ बेंद्रे, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, डॉ. इंदिरा डॅनियल, बाळासाहेब वागचौरे, अशोक चव्हाण, माजी उपसरपंच राजेंद्र गिरमकर, वाल्मीक सातकर, नानाभाऊ सात्रस, माजी सरपंच संतोष दौंडकर, अशोक कोळपे, सरपंच सारिका जांभळकर, नामदेव गिरमकर, ग्रामसेवक नीलेश लोंढे, राजेंद्र सांत्रस, जया शिरसाट, गोविंद सुरवसे, सरपंच कमल प्रकाश शिवले आदी उपस्थित होते.
--
चौकट
--
१२० बेडची सोय - चंद्रभागा कार्यालयाच्या वतीने १२० बेडची सोय असलेल्या कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. रुग्णांना आंघोळीसाठी गरम पाणी, स्वच्छतागृहाची, विजेची, पंख्याची, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. काही दानशूर मंडळींनी रुग्णांसाठी मोफत वस्तू स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत केली तर काहींनी विविध सेवा पुरवण्याची इच्छा व्यक्त केली. कोविड केअर सेंटरसाठी स्वतंत्र आरोग्य कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे.
--
फोटो क्रमांक : २१ रांजणगाव सांडस उरळगाव कोविड केअर सेंटर.
फोटो ओळी : उरळगाव (ता. शिरूर) कोविड केअर सेंटर सुरू करताना डॉक्टर, परिचारिका
फोटो : उरळगाव (ता. शिरूर) कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी सुजाता पवार, तहसीलदार एल .डी. शेख आणि इतर मान्यवर.